संपूर्ण देशाचं लक्ष आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे आहे. कधी एकदा राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि रामलल्लाचं दर्शन घेता येईल या प्रतीक्षेत देशभरातले रामभक्त आहेत. या सर्व रामभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आयोध्येतलं राम मंदिर भाविकांसाठी कधी खुलं केलं जाणार याची तारीख समोर आली आहे.
सध्या आयोध्येत मोठ्या वेगानं राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे. हे भव्य मंदिर २०२३ पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३ पासून जगभरातल्या रामभक्तांना आपल्या लाडक्या रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे.
अयोध्येतील राम मंदिर हा समस्त हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. १९५० च्या दशकात विवादित जागेवर मूर्ती सापडल्यापासून ते १९८० च्या दशकात राजीव गांधी सरकारच्या काळात मंदिराचे कुलूप उघडण्यापर्यंत आणि ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिद पाडल्यापासून ते २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने विवादित जागेवर मंदिर बांधायला दिलेल्या परवानगी पर्यंतचा हा राम मंदिराचा प्रवास आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीही, बाबराने राम मंदिर पाडल्यापासूनच हिंदूंनी अनेक वेळा त्याच जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी अनेक युद्ध केली. परंतु आता २०२१ मध्ये पहिल्यांदा या पवित्र जागेवर राम मंदिराच्या पायाभरणीला सुरवात झाली आहे.
हे ही वाचा:
जेंव्हा मोदी विरोधकांची आपसातच जुंपते….
पूरग्रस्तांना ११,५०० नाही, तर केवळ १५०० कोटींची तातडीची मदत
खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार
ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा
फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेतून राम मंदिर निधी संकलन न्यासाच्या स्थापनेची घोषणा केली होती. राम मंदिराच्या बांधणीसाठी या न्यासाची निर्मिती करण्यात आली आहे.