सुपरस्टार रजनीकांत यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावून परतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी या सोहळ्याला आध्यात्मिक सोहळा मानतो. राजकारण नव्हे,’ अशी प्रतिक्रिया देऊन हा ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होणाऱ्या पहिल्या १५० जणांमध्ये मी होतो, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
सुपरस्टार रजनीकांत यांनी पत्नी लता, भाऊ सत्यनारायण राव आणि नातवासह अयोध्येतील राम मंदिर उद्गाटन सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यानंतर ते २३ जानेवारीला चेन्नईला परतले. त्यांनी दरवर्षी अयोध्येला जाण्याचा मानस व्यक्त केला. ‘मला खूप छान दर्शन मिळाले. जेव्हा राम मंदिर खुले झाले. तेव्हा रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्या पहिल्या १५० जणांमध्ये मी होतो. त्यामुळे मला खूप आनंद झाला,’ अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी दिली.
हे ही वाचा:
इम्रान खान यांना सात प्रकरणांमध्ये जामीन पण; निवडणूक लढवण्याचा मार्ग बंदचं
ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या शहाजहान शेखच्या घराचे कुलूप तोडले
कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!
हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार
हा आध्यात्मिक सोहळा होता की राजकीय, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी माझ्यासाठी हा आध्यात्मिक सोहळा होता, राजकीय नव्हे. प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात आणि ती प्रत्येकवेळी जुळतीलच, असे नव्हे, असे ते म्हणाले.