अयोध्येत प्रभू श्री रामाचे मंदिर उभारणे हे प्रत्येक रामभक्ताचे स्वप्न होते आणि आता ते स्वप्न साकार होत असताना सर्वजण आनंदी आहेत. राम मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत येत आहेत. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे. यानिमित्ताने रामभक्त प्रभू रामासाठी अनेक भेटवस्तू पाठवत आहेत.प्रभू रामासाठी एका भाविकाने तब्बल ५०० किलोचा नगारा वाद्य (मोठा ढोल) पाठवले आहे.
अयोधते प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे.पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.सोहळ्यापूर्वीच अयोध्येत भाविकांची गर्दी होत आहे.भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी दशभरातील राम भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत.सोहळ्यासाठी अनेक भाविक अयोध्येला भेटवस्तू देत आहेत.अशाच एका भाविकाने प्रभू राम मंदिराला नगारा हे वाद्य भेट म्हणून दिले आहे.हा नगारा राम मंदिरात बसवण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
गावातून पळून गेलेले जोडपे मुलासह पुन्हा परतले, तिघांची गोळ्या घालून केली हत्या!
अजित पवार जाणार अयोध्येला, निमंत्रण मिळाले!
कॉंग्रेसने राम मंदिर निमंत्रण नाकारून पापक्षालनाची संधी गमावली
मेहबुबा मुफ्तींच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावल्या!
या नगाऱ्याचे वजन तब्बल ५०० किलो आहे.या नगाऱ्याच्या पृष्ठभागावर सोने आणि चांदीचा लेप देण्यात येणार आहे.लोखंड आणि तांब्याचाही वापर करण्यात आला आहे.या नगाऱ्याचे वैशिष्ठ असे आहे की, हा नगारा जेव्हा वाजवला जाईल तेव्हा या नगाऱ्याचा आवाज तब्बल १० किलोमीटर अंतरापर्यंत जाणार आहे. हा नगारा डबगर समाजाच्या लोकांनी तयार केला आहे.गुजरात विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रमंत्री अशोक रावल यांनी पत्र पाठवून हा नगारा स्वीकारण्याची शिफारस केली आहे.
तसेच जलेसर एटा येथील एका रामभक्ताने रामलल्लाला भेट म्हणून मोठी घंटा पाठवली आहे. जी सहा फूट लांब आणि पाच फूट रुंद आहे. या घंट्याचे वजन तब्बल २४०० किलो आहे.यासह गुजरातमधील बडोदा येथून रामलल्लालासाठी जगातील सर्वात मोठी १०८ फूट लांब अगरबत्ती आणण्यात आली आहे. या अगरबत्तीला बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला असून सुमारे ५ लाख रुपये इतका खर्च झाला आहे.या अगरबत्तीचे वजन ३६१० किलो आहे.ही अगरबत्ती बनवताना यामध्ये ३६५ घटकांचा समावेश करण्यात आला आहे.