अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात

अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात झाली आहे. आज सकाळीच एका शुभ मुहूर्तावर राम मंदिराच्या पायाभरणीला सुरवात करण्यात आली. यावेळी राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे काही पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर हा समस्त हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. १९५० च्या दशकात विवादित जागेवर मूर्ती सापडल्यापासून ते १९८० च्या दशकात राजीव गांधी सरकारच्या काळात मंदिराचे कुलूप उघडण्यापर्यंत आणि ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिद पाडल्यापासून ते २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने विवादित जागेवर मंदिर बांधायला दिलेल्या परवानगी पर्यंतचा हा राम मंदिराचा प्रवास आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीही,  बाबराने राम मंदिर पाडल्यापासूनच हिंदूंनी अनेक वेळा त्याच जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी अनेक युद्ध केली. परंतु आता २०२१ मध्ये पहिल्यांदा या पवित्र जागेवर राम मंदिराच्या पायाभरणीला सुरवात झाली आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रपतींच्या देणगीने राम मंदिर निधी संकलनाचा शुभारंभ

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली राम मंदिराला देणगी

हो गया काम; जय श्रीराम

भव्य राम मंदिर निर्माणासाठी मकर संक्रातीपासून निधी संकलन

फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेतून राम मंदिर निधी संकलन न्यासाच्या स्थापनेची घोषणा केली होती. राम मंदिराच्या बांधणीसाठी या न्यासाची निर्मिती करण्यात आली आहे.

Exit mobile version