रामलल्लाच्या बालरूपासारख्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होणार

रामलल्लाच्या बालरूपासारख्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होणार

कमळाच्या पाकळीसारखे डोळे… चंद्रासारखा चमकणारा चेहरा… गुडघ्यापर्यंत पोहोचणारे लांबसडक हात… ओठांवर प्रसन्न हास्य… अन् एकूणच पवित्र असा साधेपणा ओतप्रोत भरलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येतील राम मंदिरात होणार आहे.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा होणार आहे. त्यासाठी श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीने रामलल्लाच्या मूर्तीची निवड केली आहे. ही मूर्ती रामाच्या बालरूपातील असेल. मूर्तीमध्ये धनुष्यबाण नसेल. परंतु ते सजावटीचा भाग असेल.

मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समितीने आधीपासूनच साकारलेल्या तीन मूर्तींपैकी या मूर्तीची निवड केली आहे. विश्वस्त अनिल मिश्रा यांनी मूर्तीबाबत समाधान व्यक्त केले आहे. मात्र मूर्तीची अधिकृत घोषणा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. या मूर्तीची निवड अंतिम करण्यापूर्वी मूर्तींच्या विविध पैलू आणि परिमाणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

निर्माणाधीन मूर्ती रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणातील प्रभू रामाच्या चित्राप्रमाणे तयार केल्या आहेत. तर धनुष्य आणि बाण असलेल्या भगवान रामाचे प्रतिनिधित्व या मूर्तीत नाही. परंतु संपूर्ण सजावटीचा एक भाग म्हणून त्याचा समावेश केला जाईल.

‘प्रभू रामाच्या सर्वांत उत्कृष्ट आणि आकर्षक रूपात, विशेषतः पाच वर्षांच्या बालरूपातील रामाच्या मूर्तीत प्राण फुंकले जातील,’ असे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले.nराम लल्लाच्या मूर्तीचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत, चंद्रासारखा चमकणारा चेहरा, गुडघ्यापर्यंत लांब हात, ओठांवर प्रसन्न हास्य आणि अंगभूत दैवी साधेपणा या मूर्तीत ओतप्रोत भरलेला आहे.

रामलल्लाची ५१ इंची उल्लेखनीय मूर्ती तीन निवडक कलाकारांनी तयार केली आहे. यातील दोन मूर्ती कर्नाटकातील श्याम शिला दगडापासून आणि एक पांढऱ्या संगमरवरापासून बनवलेली आहे. तज्ज्ञांनी मूर्तीच्या निर्मितीपूर्वी दगडांची सखोल तपासणी केली. या मूर्तीचे आयुष्य दीर्घकाळ टिकावे, तसेच सुमारे एक हजार वर्षे तरी या मूर्तीला जीर्णोद्धाराची गरज भासू नये, इतक्या बारकाईने ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ, श्रीराम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी

राहुल गांधींना मोठा नेता मानण्याची गरज नाही!

म्हैसूर: ड्रेनेजच्या खोदकामात ११ व्या शतकातील तीन जैन शिल्पे सापडली!

सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे

अधिकृत घोषणा करण्यापूर्वी, निवडलेल्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सखोल तपासणी केली जाईल. निकष परीक्षेत रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणातील भगवान रामाच्या चित्रणांशी तुलना केली जाईल. याव्यतिरिक्त, हळद, चंदन, धूप आणि इतर पूजेच्या साहित्याचा वापर केल्यामुळे मूर्तीवर कोणताही डाग पडणार नाही किंवा अन्य परिणाम होणार नाही ना, अशाप्रकारे मूर्तीची चाचणी केली जाईल. धर्मग्रंथात करण्यात आलेले वर्णन आणि त्याचे शुद्ध स्वरूप आणि अभिव्यक्तीशी किती सुसंगत आहे, यावर या मूर्तीची अंतिम निवड ठरेल.

Exit mobile version