28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरधर्म संस्कृतीतर 'आदिपुरुष' प्रदर्शित होऊ देणार नाही

तर ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होऊ देणार नाही

राम कदम यांनी दिला इशारा

Google News Follow

Related

प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लूक आणि प्रतिमेचा सोशल मीडियापासून चित्रपट परिवारापर्यंत सगळीकडून टीका होत असतानाच आता त्यात राजकीय विरोधाचा सूरही तीव्र झाला आहे. मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना पत्र लिहून चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी केली असतानाच आता भाजप आमदार राम कदम यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

राम कदम यांनी ट्विट करून चित्रपट निर्मात्यांनी क्षुद्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी देवदेवतांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी चित्रपटांवर आजीवन बंदी घालण्याची गरज असल्याचं अमदार कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आमच्या देवता आणि श्रद्धास्थानाचं विडंबन करून कोट्यवधी रुपये कमवायचे आणि नंतर माफी मागायची, ही नाटकं आता चालणार नाहीत, असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये राम कदम यांनी लिहिले आहे की, चित्रपटातील दृश्ये कापून चालणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी अशा कोणत्याही चित्रपटावर आजीवन बंदी घातली पाहिजे आणि जबाबदार व्यक्तींना या उद्योगात काही वर्षे काम करण्यासही बंदी घातली पाहिजे. भविष्यात असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करू नये यासाठी हे आवश्यक असल्याचे  कदम यांचे म्हणणे आहे.

राम कदम यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना लक्ष्य करताना ट्विटमध्ये लिहिले आहे की, त्यांनी ‘तान्हाजी’ सारखा चित्रपट बनवला, ज्याला जगभरात पसंती मिळाली. हिंदू स्वाभिमानाला आणि मराठी अस्मितेला न्याय दिला म्हणून हे घडले, पण जर ‘आदिपुरुष’ रावणाला योग्य दाखवण्याचा आणि सीतेचे अपहरण न्याय्य असेल असे प्रयत्न करत असेल तर आम्ही तसे करू देणार नाही.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

२०२० मध्येही ‘आदिपुरुष’ला विरोध

राम कदम यांचा ‘आदिपुरुष’ यांना असलेला हा विरोध नवा नाही. ६ डिसेंबर २०२० रोजी जेव्हा चित्रपटाचा टीझर पोस्टर आला तेव्हाही राम कदम यांनी चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर सैफ अली खानच्या एका विधानावर राम कदम भडकले होते. सैफने एका मुलाखतीत चित्रपटात रावणाची कृत्ये धार्मिक म्हणून दाखवणार असल्याचे म्हटले होते . सैफच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते राम कदम भडकले होते . मात्र, नंतर सैफने याबद्दल माफीही मागितली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा