श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट

देशभर कोरोनाचा थैमान सुरु असताना अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्याला आता सामाजिक संस्था, संघटनांचाही हातभार लागत आहे. असाच एक निर्णय आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने घेतला आहे. या न्यासातर्फे आता अयोध्येत दोन ऑक्सिजन प्लॅन्ट उभारले जाणार आहे.

भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. या परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असून अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून सर्वतोपरी पाऊले उचली जात असून परिस्थिती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र सरकारकडून ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर बंदी घालून तेथील ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवला जात आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस सारख्या उपक्रमांमधून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. तर टाटा, अंबानी, मित्तल यांसारख्या काही उद्योगपतींकडून स्वतःहून ऑक्सिजन पुरवठ्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!

लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण

वेदांत समुहाकडून प्राणवायूसाठी दक्षिणेतील काही भागांत मदत

मोदी सरकारवर टीका ही तर मजबूरी

यातच आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने दोन ऑक्सिजन प्लॅन्ट उभारले जाणार आहे. या प्लॅण्टची किंमत तब्बल ५५ लोक रुपये असणार आहे. न्यासाचे विश्वस्त डॉ.अनिल मिश्र यांनी ही माहिती दिली. देशातील कोरोना परिस्थितीमुळे सारा देश त्रस्त आहे. अनेक ठिकाणी भासणार ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्याच्या दृष्टीने न्यासाकडून हा निर्णय घेतला गेला आहे. अयोध्या येथील दशरथ वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात हे प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे.

Exit mobile version