छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अवघी रायगड नगरी सजली असून या सोहळ्याचा नाद सगळीकडे दुमदुमणार आहे. राज्य शासनाच्या वतीने रायगडावर हा भव्यदिव्य शिवराज्याभिषेकाचा सोहळा आयोजित केला जाणार आहे. अत्यंत दिमाखात हा सोहळा साजरा केला जावा म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे.
तिथीनुसार हा सोहळा आज २ जून रोजी होत आहे. त्याआधी रायगडावर शिरकाई देवीच्या मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि व्याडेश्वराच्या मंदिरात अभिषेक करण्यात येईल. शुक्रवारी २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही वाचून दाखविला जाणार आहे. १ जूनपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन इथे करण्यात आले आहे. ६ जून रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बोधचिन्हाचे लोकार्पण
दरम्यान, या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
हिंदू नावाचा वापर करून त्याने मॉडेलला फसवले, पण द केरळ स्टोरीने दिली तिला प्रेरणा
धर्मांतरित झालेल्या तरुणाने प्रेयसीचे डोके फोडले; लव्ह जिहादचा उलटा प्रकार
सन २०२७पर्यंत जीडीपीमध्ये भारत जगभरात अव्वल तीनमध्ये येणार
कर्नाटकनंतर आता राजस्थान काँग्रेस सरकारकडून ‘फुकट’ची वीज
पार्किंगची सोय
या सोहळ्यासाठी राज्यातून किंवा शेजारच्या राज्यातून येणाऱ्या सर्व शिवभक्तांना कोणतीही अडचण होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. पाचाड, कोंझर, वालुसरे येथे पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. तर प्रचंड उकाडा असल्यामुळे गडावर १० हजार लिट व गडाच्या पायथ्याशी ४० हजार लीटर पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रायगड किल्ला परिसरात जवळपास २ हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल. गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा, नाणे दरवाजा असे दोन मार्ग असतील.