‘कोशंट सुमेर जयन्तिया आहेत. मेघालयातील आपली परंपरा, संस्कृती त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जपली आहे. मेघालयातील पूर्वापार चालत आलेली संस्कृती, नृत्य जिवंत ठेवण्याचे काम सुमेर यांनी केले. आपल्या भाषेला त्यांनी जिवंत ठेवले. विपरित परिस्थितीत भाषेला जिवंत ठेवणे, जीवाला धोका असतानाही हे काम करणे हे कोशंट यांचे कर्तृत्व आहे. अनेक लोकांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले तरीही काही लोकांनी आपली पूजापद्धती सोडली नाही. रस्ते, वीज दिली नाहीत तरी चालेल. स्वभाषा, स्वसंस्कृती सोडणार नाही, असा दृढनिश्चय केला. म्हणूनच आपल्या संस्कृती रक्षणासाठी जीवन देणारा सुमेर हा माणूस महान आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि माय होम इंडिया या संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी कोशंट सुमेर यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. माय होम इंडियाच्या वतीने कोशंट यांचा बुधवारी वन इंडिया पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी देवधर यांनी कोशंट यांच्यावर भाष्य केले.
दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात हे पुरस्कार वितरण पार पडले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय मायाळू (राजदत्त) यांच्या हस्ते हा पुरस्कार कोशंट सुमेर यांना प्रदान करण्यात आला. माय होम इंडियाचा हा ११वा पुरस्कार होता. यावेळी सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, माय होम इंडियाचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, माय होम इंडियाचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रावण झा उपस्थित होते.
सुनील देवधर यांनी या पुरस्काराचा इतिहास सांगितला. माय होम इंडियाचा पहिला पुरस्कार पिआँग तेमझेन जमीर यांना देण्यात आला. नागालँडमध्ये हिंदी भाषेचा प्रचार त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केला. पियाँग हे ख्रिस्ती असले तरी भारतातच राहायाल पाहिजे या मताचे होते. म्हणतात. भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला तेव्हा नागालँडमध्ये आक्रोश झाला आम्हाला वेगळे व्हायचे आहे. पण बहुसंख्य लोक भारतासोबत होते. पण ख्रिश्चन लोकांमध्ये एक नॅरेटिव्ह झाला की भारतासोबत राहायचे नाही. पण एक ख्रिश्चन जमीर हिंदी भाषेसाठी कार्य करत होते. चर्चमधून त्यांना बोलावणे आले आणि त्यांना जाब विचारला गेला. पण माझा देव कोण याचा अधिकार मी आपल्याला दिला, पण देश व भाषा कोणती असावी याचा अधिकार माझा आहे. अतिरेक्यांनी हत्येची धमकी त्यांना दिली. पण देश एक राहण्यासाठी मी हिंदी शिकवत राहीन मारायचे असेल तर मारा, असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले. तेव्हा हा पुरस्कार सुरू करण्याचे ठरले आणि पहिला पुरस्कार जमीर यांना देण्यात आला.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारचे वागणे तालिबान सारखे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा
माय होम इंडियाचा पुरस्कार कोशंट सुमेर यांना
नारायण राणेंच्या घरावर कणकवली पोलिसांची नोटीस
प्रमुख पाहुणे व प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांनीही आपले मत यावेळी व्यक्त केले. देवधर यांनी यावेळी राजदत्त यांच्या कर्तृत्वाविषयी भाष्य केले तसेच सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर यांचे मोठेपणही त्यांनी विषद केले. पूर्वोत्तम भारतातील कियाना नांगबा यांच्या संघर्षाचा इतिहासही त्यांनी उलगडून सांगितला.