‘अफजल खान वधा’ला विरोध सहन केला जाणार नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला दम

‘अफजल खान वधा’ला विरोध सहन केला जाणार नाही

काेविडचे निर्बंध हटल्यानंतर राज्यात जाेरदार गणेशाेत्सवाची तयारी सुरू आहे. गणेशाेत्सवाच्या देखाव्यासाठी नवनवीन संकल्पना लढवल्या जात आहे. पुण्यातल्या संगम तरुण मंडळ ट्रस्टच्या सार्वजनिक गणशाेत्सव मंडळानं यंदा अफजल खानाच्या वधाचा देखावा उभारण्याचा विचार केला हाेता. या संदर्भात मंडळाने पाेलिसांकडे परवानगी मागितली. परंतु पाेलिसांनी कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याचे कारण देत ही परवानगी नाकारली. या परवानगी नाकारण्यावरून पुण्यात माेठा वाद निर्माण झाला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच अन्य गणेश मंडळांनी निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अफजल खान वधाच्या देखाव्यावर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही, असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

संगम तरुण मंडळ ट्रस्टने अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक जिवंत देखावा सादर करण्यासाठी ११ ऑगस्टला काेथरूड पाेलिसांकडे अर्ज केला हाेता. पण दाेन दिवसांनी पाेलिसांनी परवानगी नाकारली. अफजल खानाच्या वधाचा इतिहास सर्वाना माहिती आहे. पण ताे इतिहास जाहीर दाखवल्यास मुस्लिमांच्या भावना दुखावतात असे कारण देऊन पाेलिसांनी परवानगी नाकारली. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी अफझल खान वधाचा देखावा दाखवल्यावर भावना दुखवणार असतील तर त्या भावना गेल्या खडड्यात असं म्हटलं आहे.

अफजल गुरू, कसाब, मेनन यांना फाशी दिल्यावर भावना दुखवतात असं सांगितलं तर तेही आपण भारताच्या इतिहासातून रद्द करणार का? मुंबईवर हल्लाच झाला नाही असं म्हणणार का ?अशी आक्रमक भूमिका दवे यांनी घेतली आहे. अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटायला बाेलावून दगा फटका केला हे सगळ्यांना माहिती आहे. असे असताना अफझल खान माेठी व्यक्ती आहे. त्याने काय माेठा पराक्रम केला असा सवाल करत इतर गणेश मंडळांनीही संगम तरुण मंडळ ट्रस्टला पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

दहिहंडीतील अफजल खान वध व्हायरल

मुंबईतल्या दहीहंडीमध्ये अफजल खान वधाचा जिवंत देखावा साकारला हाेता. हा देखावा अत्यंत अनाेखा ठरला. या वधाचा व्हिडिओ माेठ्या प्रमाणावर व्हायरल झाला हाेता. त्यामुळे पुण्यातील अफजल खानाच्या जिवंत देखाव्याला परवानगी नाकारण्याच्या पाेलिसांच्या भूमिकेचा गणेश कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडण्याचीही धमकी दिली हाेती.

देखाव्याला अखेर परवानगी

संगम तरुण मंडळ ट्रस्टने पाेलिसांनी नाकारल्यावर मेल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ णि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली हाेती. अखेर काेथरुड पाेलिसांनी हा जिवंत देखावा सादर करण्यासाठी परवानगी दिली आहे.

Exit mobile version