राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सारकारने घेतला आहे. यासंदर्भातील सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केली होती. प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी काही जिल्ह्यात स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर करतात. पण, यंदा राज्यात सर्वत्र दहीहंडीनिमित्त सुट्टी जाहीर करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्य सचिवांन सांगून ही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना देणार असल्याचेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

 

बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने

“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

गेली दोन वर्षे कोरोनामुळं सणांवर निर्बंध होते. आता हे सण धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला असून यंदा अशाप्रकारचे कुठलेही निर्बंध असणार नाहीत. परंतु, न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांचे पालन कराव, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

Exit mobile version