27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरधर्म संस्कृतीबांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

सकल हिंदू समाज झाला संघटित

Google News Follow

Related

हिंदू नव वर्ष स्वागत समिती, बोरिवली तर्फे बांग्लादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात, रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता, बोरीवली पश्चिम रेलवे स्टेशन प्लेटफॉर्म नंबर ३ च्या बाहेर सकल हिंदू समाजाला संगठीत होण्याचे आवाहन करण्यात आले होते. दीड हजारांहून अधिक हिंदू या ठिकाणी जमले. ज्यात ११०० हून अधिक पुरुष आणि ४०० च्या आसपास महिलांचा समावेश होता.

यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अत्याचारित हिंदूंच्या आपण पाठीशी आहोत आणि अशा जनआक्रोश मोर्चांच्या रूपात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यात येईल, अशी ग्वाही उपस्थितांनी दिली.

हे ही वाचा:

एआयएमपीएलबी: सेक्युलर सिव्हिल कोड मुस्लिमांना मान्य नाही!

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

स्थलांतर कसलं ? हिंदुना त्रास देणाऱ्यांचे ग्रहांतर करा !

ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणाऱ्या विद्यार्थ्याला टाकले कोठडीत

जमलेल्या नागरिकांना श्री श्रिराज नायर प्रवक्ता, विश्व हिंदू परिषद व पराग नेरूरकर, संपादक विश्व संवाद केंद्र, तसेच श्री गणेश खंणकर उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष, भाजप यांनी मार्गदर्शन केले. बांगलादेशातील परिस्थिती आपल्या देशात उद्भवू नये म्हणून सकल हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी येथे जय श्रीरामच्या घोषणा देत मोर्चा काढला. हातात भगवे ध्वज धारण करून बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

या एकत्रीकरणाचे रूपांतर भव्य मोर्चात झाले. बोरिवली स्टेशन पासून सुरू झालेला ह्या मोर्चाची सांगता वंदे मातरम् गीताने, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान बोरिवली पश्चिम येथे झाली. बोरिवली विधानसभा आमदार सुनील राणे, विलास भागवत, रा. स्व. संघ मुंबई महानगर सहकार्यवाह , यांनीही मोर्चात सहभाग घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा