मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा!

खासदार प्रज्ञा ठाकुर यांचा सल्ला

मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा!

संन्यासी म्हणतात की देवाने निर्माण केलेल्या या जगातील सर्व अत्याचारी आणि पापींचा नायनाट करा. तुमच्या मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा. असे वक्तव्य खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केले आहे. शिवमोग्गाच्या हर्षासह हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येकडे लक्ष वेधून त्यांनी लोकांना स्वसंरक्षणासाठी घरी धारधार चाकू ठेवा असा सल्ला दिला आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे हिंदू जागरण वैदिक यांच्या दक्षिण विभागाच्या वार्षिक परिषदेत त्या मार्गदर्शन करत होत्या.

प्रज्ञा ठाकुर पुढे म्हणाल्या की, घरात शस्त्र ठेवा आणि काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी चाकू तरी धारदार ठेवा, कधी काय परिस्थिती येईल माहीत नाहि. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. जर कोणी आमच्या घरात घुसून हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे. तुमच्या घरी पूजा करा, तुमचा धर्म आणि धर्मग्रंथ वाचा, तुमच्या मुलांना त्याबद्दल शिकवा, जेणेकरून मुलांना आपली संस्कृती आणि मूल्ये कळतील.
पालकांना आपल्या मुलांना मिशनरी संस्थांमध्ये शिक्षण न देण्याचा सल्ला देतांना खासदार ठाकूर म्हणाल्या “असे केल्याने तुम्ही तुमच्यासाठी वृद्धाश्रमाचे दरवाजे उघडाल. मुले मिशनरी संस्थांमध्ये शिकलयास तुमच्या संस्कृतीची होणार नाहीत. मुलं वृद्धाश्रमात वाढतात आणि स्वार्थी बनतात.

हे ही वाचा:

उपनगरातील भाडेकरू इमारतींना न्याय मिळणार!

मुघलांच्या फौजेला साहिबजादे निर्भयपणे सामोरे गेले! त्यांच्या चरणी नतमस्तक

शिवसेनेचे खासदार , व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाळ धूत यांना अटक

प्रेयसीच्या चेहऱ्यावर लाथाबुक्के मारणाऱ्याचे घर केले उद्ध्वस्त

त्यांच्याकडे (विशेष समाजाला) जिहादची परंपरा आहे, जर ते काही करत नसतील तर ते लव्ह जिहाद करतात. प्रेम केले तरी त्यात जिहाद करतात. आपण (हिंदू) देखील देवावर प्रेम करतो, प्रेम करतो, संन्यासी त्याच्या देवावर प्रेम करतो असेही त्या म्हणाल्या

Exit mobile version