भारतीय संस्कृती आणि संगीताबद्दल जर्मनीच्या कैसमीला असलेले हे वेड कौतुकास्पद आहे. तिचा हा प्रयत्न प्रत्येक भारतीयाला भारावून टाकणारा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. रविवारी झालेल्या त्यांच्या १०५ व्या मन कि बात या कार्यक्रमात त्यांनी कैसमीच्या प्रयत्नांना दाद दिली.
कैसमीच्या गोड आवाजातील गाणी भारावून टाकणारी असल्याचे ते म्हणाले. कैसामीही जन्मापासून दृष्टीहिन आहे. असे असूनसुद्धा तिला भारतीय संगीताबद्दल आणि येथील संस्कृतीबद्दल इतकी रुची निर्माण झाली आहे. तिचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिने गायलेली कन्नड भाषेतील एक गाणं आणि देवदेवतांची स्तुती त्यांच्या मन कि बात या कार्यक्रमातून ऐकवली.
हेही वाचा..
भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !
भारत कॅनडा ताणलेल्या संबंधांमुळे शीख सिनेट उमेदवार सरबजीत पायउतार !
देशातील तीन लाख विकास सेवा संस्थांचे बळकटीकरण करणार
निज्जरच्या हत्येनंतर एफबीआयने यूएस खलिस्तान्यांना केले होते सावध !
२१ वर्षाच्या कैसामीने भारतीय संस्कृती आणि संगीत एक जर्मन नागरिक असूनही इतक्या सहजतेने म्हटलं आहे कि कोणालाही ती भारतीय नाही यावर विश्वास बसू शकणार नाही. सध्या कैसमीची गाणी इंस्टाग्रामवर प्रचंड गाजत आहेत. ज्या मुलीने कधी भारत पाहिलेला नाही, ती कधीच भारतात आलेली नाही मात्र ती भारतीय संगीताची किती चाहती आहे, हे तिने म्हटलेल्या गाण्यांवरून लक्षात येते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या या कलेची दखल मन कि बात कार्यक्रमातून घेतल्यामुळे असंख्य भारतीय नागरिकांनी कैसमीची गाणी ऐकण्यासाठी इंस्टाग्रामवर उड्या घेतल्या आहेत.
सध्या कैसमीचे इंस्टाग्रामवर ३ लाख ८७ हजार हजार चाहते आहेत. आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या गाण्यांच्या ८५१ पोस्ट केल्या आहेत. भारतीय संगीत आणि संस्कृतीशी निगडित अनेक गाणी, श्लोक, देवीदेवतांची स्तुती करणारी स्तोत्रे तिने गायली आहेत. अनेक हिंदी चित्रपटांमधील गाणीही तिने गायली आहेत. जर्मनीची मूळची असून त्यात ती अंध आहे अशा परिस्थित तिने गायलेल्या गाण्यांची भुरळ जगभरातील भारतीयांना पडली आहे. केवळ गाणंच नाही तर ती तबला वादनही करते. अनेक भारतीय भाषांमध्ये तिने हा प्रयत्न केला आहे. संस्कृत, हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड, आसामी, बंगाली, मराठी, उर्दू, या सर्व भाषांमध्ये तिने आपले सूर आजमावले आहेत.