पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबू धाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले!

२७ एकर मध्ये पसरलेल्या मंदिराच्या बांधकामासाठी ७०० कोटी खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबू धाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले!

संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले.मंदिराच्या अभिषेकाची तयारी सकाळपासूनच सुरु आहे. अबुधाबीच्या स्वामी नारायण मंदिराच्या उदघाटनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते.पंतप्रधानांनी पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून मंदिराचे उद्घाटन केले आहे.स्वामी नारायनांचे हे विशाल मंदिर २७ एकर जागेवर पसरले आहे.या मंदिराच्या बांधकामासाठी ७०० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू धाबी येथे आयोजित जागतिक सरकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी यूएईचे कौतुक केले आणि स्वागतासाठी त्यांचे आभार मानले. शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तेथे लोकशाही सरकार चालवण्याचे धडेही शिकवले.

हे ही वाचा:

बिहारमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात लागली आग!

पालघर: मासेमारीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाच्या पायाचा शार्कने घेतला चावा!

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडेंना भाजपाची उमेदवारी

केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स

अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले.बुधवारी सकाळपासून मंदिर अभिषेक विधी सुरू आहे.बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) हे विशाल हिंदू मंदिर बांधले आहे.हिंदूंचे मंदिर उभारण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने जमीन दान केल्यानंतर या मंदिराचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले.या मंदिरात गंगा आणि यमुनेचे पवित्र पाणी आणि राजस्थानचा गुलाबी वाळूचा दगड वापरण्यात आला आहे.या मंदिराच्या दोन्ही बाजूंनी गंगा आणि यमुनेचे पवित्र पाणी वाहत आहे, जे भारतातून मोठ्या कंटेनरमध्ये आणले गेले आहे.

Exit mobile version