लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानात मग्न होणार आहेत.कन्याकुमारी येथील रॉक मेमोरियलयामध्ये एक दिवस सकाळ आणि एक दिवस रात्र असे दोन दिवस पंतप्रधान मोदी ध्यान करणार आहेत.विशेष म्हणजे याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा ध्यान केले होते.पंतप्रधान मोदी ३० मेच्या संध्याकाळपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत मंडपमध्ये ध्यान करणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही ध्यान साधना केली आहे.केदारनाथमध्येही ते ध्यान साधनेला बसले होते. यावेळी ते कन्याकुमारीमध्ये ध्यान साधनेला बसणार आहेत.हे ठिकाण देखील खास आहे कारण असे म्हटले जाते की, स्वामी विववेकानंद ध्यानात मग्न असताना या ठिकाणी त्यांना भारताचे पहिले दर्शन घडले होते.तसेच या ठिकाणी ध्यान धारणा केल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाल्याचे देखील म्हटले जाते.
हे ही वाचा:
‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स
विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट उलटली, एकाचा मृत्यू!
पावसाळ्यातील संकटांना तोंड देण्यास यंत्रणा सज्ज
दिल्लीतील आग; मालकाने परवान्याशिवाय चालवली चक्क तीन रुग्णालये
असे मानले जाते की, गौतम बुद्धांच्या जीवनात जसे सारनाथचे स्थान होते, तसेच स्वामी विवेकांनदांच्या जीवनात रॉक मेमोरियलयचे स्थान आहे.देशभर फिरून आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तीन दिवस ध्यान केले.स्वामी विवेकांनदांनी या ठिकाणी विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. असे बोलले जात आहे की, पंतप्रधान मोदी ध्यान साधना करतील आणि स्वामी विवेकानंदांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या त्यांच्या संकल्पांचा पुनरुच्चार करतील.
तसेच भगवान शंकराची वाट पाहत असताना माता पार्वतीनेही एका पायावर उभे राहून या ठिकाणी ध्यान केले होते, असेही म्हटले जाते.हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे.भारतीय मान्यतेनुसार या स्थानाला अत्यंत पवित्र म्हणून ओळखले जाते.