राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून कोविंद आणि मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांनी खास मराठीत ट्विट करत शुभेच्छा दिल्या तर इतर राज्यातील नागरिकांनाही त्या त्या राज्यातील सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नव वर्षारंभ. हे हिंदू नववर्ष वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. जसे महाराष्ट्रात या ‘गुढी पाडवा’ म्हणत रूढी उभारत हा सण साजरा करतात तर दक्षिणेकडच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात हा सण उगादी किंवा युगादी म्हणून ओळखला जातो. मणिपूर मध्ये हे नवे वर्ष ‘सजीबू चैरावबा’ म्हणून ओळखले जाते तर काश्मिरी बांधव याला ‘नवरेह’ म्हणतात. सिंधी बांधव याच नववर्षाला ‘चेतीचांद’ म्हणतात. तर शीखांमध्ये हे नवे वर्ष ‘बैसाखी’ म्हणून साजरे केले जाते. या सर्वच सणांच्या शुभेच्छा राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा:

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

नंदुरबारमध्ये रुग्णांसाठी रेल्वेचा मदतीचा हात

ममतांना निवडणूक आयोगाचा दणका

ठाकरे सरकारच्या अकार्क्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

हे सण विविधतेतील एकतेचे प्रतीक – राष्ट्रपती
भारतात हे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. हे भारतातील विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. या निमित्ताने देशवासियांना चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी लाभो अशा शुभेच्छा राष्ट्रपतींनी दिल्या आहेत.

सणांमधून दिसतो ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ – मोदी
नववर्षाच्या विविध सणांच्या शुभेच्छा देण्याआधी मोदींनी ट्विट करत विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीकडे लोकांचे लक्ष वेधले. “पुढच्या काही दिवसात देशातले नागरिक वेगवगळे सण साजरे करणार आहेत. या सणांमधून भारताची विविधता आणि ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ चे स्पिरिट दिसून येते. या सणांच्या माध्यमातून देशभर आनंद, ऐश्वर्य आणि बंधुता पसरावी.” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version