गोरखपूरच्या गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्य वर्षी खेमका यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर प्रदेश माधील वाराणसीचे रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून खेमका यांची तब्येत वृद्धापकाळाने खराब झाली होती. हेच त्यांच्या मृत्यूला निमित्त ठरले आहे.
राधेश्याम खेमका हे सनातन धर्माला समर्पित असलेल्या प्रसिद्ध अशा ‘कल्याण’ मासिकाचे संपादक होते. गेले चाळीस वर्ष ते या मासिकाचे संपादक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. गेले पंधरा दिवस ते आजारी होते. यातच त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना वाराणसी येथील रवींद्रपुरी भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.
राधेश्याम खेमका यांच्या मृत्यूबद्दल समाजाच्या विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून खेमका यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“सनातन धर्माचे साहित्य जनाजनात पोहोचवणारे राधेश्याम खेमका यांच्या निधनाने अत्यंत दुःख होत आहे. ते अनेक सामाजिक कार्यातही सक्रिय होते. या दुःखाच्या प्रसंगात त्यांच्या परिवार आणि प्रशंसकांसोबत माझ्या सहवेदना आहेत.” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गीता प्रेस के अध्यक्ष और सनातन साहित्य को जन-जन तक पहुंचाने वाले राधेश्याम खेमका जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। खेमका जी जीवनपर्यंत विभिन्न सामाजिक कार्यों में सक्रिय रहे। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2021
तर “खेमकाजींनी आयुष्यभर सनातन संस्कृती चे वाहक बनून प्राचीन भारतीय परंपरा जगभर पोहोचवण्याचे काम केले.” असे अमित शहा यांनी म्हंटले आहे.
गीता प्रेस के अध्यक्ष श्री राधेश्याम खेमका जी के निधन से अत्यंत दुःखी हूँ। खेमका जी ने जीवनभर सनातन संस्कृति के संवाहक बनकर भारत की प्राचीन परम्परा को दुनियाभर में पहुँचाने का काम किया। मैं उनके परिजनों व शुभचिंतकों के प्रति अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूँ। ॐ शांति शांति शांति
— Amit Shah (@AmitShah) April 4, 2021
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राधेश्याम खेमका यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज ने गोबिन्द भवन-कार्यालय, कोलकाता के अध्यक्ष व गीता प्रेस गोरखपुर द्वारा प्रकाशित अध्यात्म जगत की प्रसिद्ध पत्रिका "कल्याण" के संपादक श्री राधेश्याम खेमका जी के निधन पर गहरा शोक व्यक्त किया है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) April 4, 2021