राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत साऱ्या देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

देशभरात आज दिवाळीचा उत्साह आहे. कोरोनाच्या निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षांनी ही दिवाळी लोकांना निर्बंधमुक्त पद्धतीने जल्लोषात साजरी करता येत आहे. आज संध्याकाळी मोठ्या भक्तीभावाने लक्ष्मी पूजन केले जाणार आहे. या उत्सावाच्या दिवशी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत साऱ्या देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाश आणि आनंदाच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने ज्ञानाचा आणि ऊर्जेचा दीप प्रज्वलित करून गरजूंच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया. या महान सणानिमित्त सर्व देशवासियांच्या जीवनात सुख-समृद्धी जावो अशी प्रार्थना करते,” असे ट्विट मुर्मू यांनी केले आहे.

“सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा संबंध तेज आणि तेजाशी आहे. हा शुभ सण आपल्या जीवनात आनंदाची आणि कल्याणाची भावना वाढवो. दिवाळी कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात जावो,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

हे ही वाचा:

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

देशभरात दिवाळी सणाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईमध्ये जल्लोष दिसत असून बाजारपेठाही लोकांच्या गर्दीमुळे खुलल्या आहेत.

Exit mobile version