प्रसन्न आठवले लिखित ‘भोग आणि ईश्वर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी पार पडला. कोविडच्या निर्बंधांमुळे एका छोटेखानी घरगुती कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा झाला. मनुष्याच्या कर्माने त्याच्या वाट्याला आलेले भोग आणि ईश्वर, अध्यात्म यावरील वसतृत विवेचन या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तिच्या कर्मानुसार भोग येत असतात. भोग आणि उपभोग यांच्या मिश्रणातून आयुष्य तयार होत असते. आयुष्यात येणाऱ्या सुख-दुःखांचाही याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या कर्मावर अवलंबून असतात आणि ही कर्म फक्त याच जन्माची नसतात तर गेल्या जन्मांमधलीही असतात. या अशा गहन, गुढ गोष्टींचा शोध, त्यामागचे तर्कशास्त्र,नियम आणि हे चक्र बदलण्यासाठी काय करावे? याच्यावर या पुस्तकात भाष्य केले आहे.
हे ही वाचा:
उद्धव यांच्यापेक्षा राज एक पाऊल पुढे!
राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?
शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात
‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न
लेखक प्रसन्न आठवले यांनी सलग १३४ दिवसांची या विषयावरची लेखमाला त्यांच्या फेसबूक आणि ब्लॉगवर लिहीली होती. ती प्रचंड लोकप्रिय ठरली. या लेखांचे संकलन करून पुस्तक रूपात आणावे अशी मागणी वाचकांकडून होऊ लागली. त्यातूनच ‘भोग आणि ईश्वर’ या पुस्तकाचा जन्म झाला. मंगळवारी या पुस्तकाचा पहिला भाग प्रकाशित झाला असून पुढचा भाग लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
पुस्तकाच्या या पहिल्या भागाचे प्रकाशन सौ.नीलम जोशी आणि श्री.सुभाष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. हे दोघेही समर्थ रामदास स्वामींचे उपासक आहेत. या पुस्तकाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून १५० प्रतींची प्रकाशनपूर्व नोंदणी झाली आहे. रामनवमी पर्यंत हे पुस्तक सवलतीच्या दरात वाचकांना मागवता येणार आहे. पुस्तकाची मुळ किंमत १५० रूपये असून ३० रूपये कुरियर चार्जेस आकारण्यात येणार आहेत. पण रामनवमी पर्यंत पुस्तक सवलतीच्या दरात म्हणजेच ११० रूपयांना अधिक ३० रूपये कुरियर चार्जेस या किंमतीत मागवता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९०४९३५३८०९ या क्रमांकावर व्हाॅट्सॲपद्वारे संपर्क करावा.