अखंड भारताचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाचा उत्साह भारतभर पाहायला मिळत आहे. रविवार, १० एप्रिल रोजी देशभर मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाणार आहे. त्या निमित्ताने भागलपुर येथे भगवान श्रीरामांचे भव्य असे चित्र साकारले जाणार आहे.
पाच लाख दिव्यांचा वापर करून भगवान श्रीराम यांची ही प्रतिकृती साकारली जाणार आहे. एकूण आठ हजार स्क्वेअर फूट इतके मोठे हे चित्र असणार आहे. चारपाच दिवसांपासून या संपूर्ण कलाकृती साठी तयारी सुरु होती. बुधवार ७ एप्रिल पासून भागलपुर येथील लजपत पार्क या मैदानात या महाकलाकृतीची तयारी सुरू आहे. या भव्य चित्राची उंची १५० फूट असणार आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक
आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा
आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार
तर या भव्य चित्रासाठी एकूण बारा रंग वापरले जाणार आहेत. १५० फुटांचे हे भव्यदिव्य चित्र म्हणजे एक विश्वविक्रम असणार आहे. सहा एप्रिल रोजी वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारी टीम भागलपूर येथील या चित्राला भेट देऊन गेली.
या कार्यक्रमाला अनेक विशेष महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद, केंद्रीय मंत्री अश्विनी चौगुले, राजशिष्टाचार मंत्री रामसुरत राय, पर्यावरण मंत्री नीरज बबलू, सांस्कृतिक मंत्री आलोक रंजन यांच्या समवेत इतर खासदार, आमदार हे देखील उपस्थित असणार आहेत.