अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील तळघरातील पूजा करण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निकाल दिला आहे. अलाहबाद न्यायालयाच्या निर्णयामुळे हिंदू पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे. हिंदू पक्षांना ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजेच्या परवानगीवर बंदी घालण्यासंदर्भात मुस्लिम बाजूच्या याचिका फेटाळल्या आहेत. व्यासजी तळघरात पूजा सुरू राहील असा महत्त्वाचा निर्णय न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने दिला आहे. या प्रकरणी मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
३१ जानेवारी रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात हिंदू धर्मीयांना पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन व्यवस्था मशीद समितीच्यावतीने आव्हान देण्यात आले होते. यावर सुनावणी पार पडली असून याचिका फेटाळून लावली आहे.
Allahabad High Court dismisses plea challenging order permitting Hindu parties to offer puja in the 'vyas tehkhana' of Gyanvapi complex. pic.twitter.com/DbkADHQAIC
— ANI (@ANI) February 26, 2024
यावर हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामियाच्या आदेशावरील पहिले अपील फेटाळून लावले आहे ज्यात वाराणसी जिल्हा न्यायालयाने १७ आणि ३१ जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिले होते.” तर, अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, “अंजुमन इंतेजामिया सर्वोच्च न्यायालयात आली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात आमचे कॅव्हेट दाखल करू.”
हे ही वाचा:
“आंदोलनस्थळी दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंकडूनचं”
रशिया-युक्रेन युद्धात सुरतच्या तरुणाचा मृत्यू
प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन
ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे बोलत आहेत!
मशिदीच्या बाजूने असा युक्तिवाद केला की उपासनेच्या अधिकारासाठी दाखल करण्यात आलेल्या दिवाणी दाव्यात हक्क ठरविल्याशिवाय पूजेला परवानगी देणे हे कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन आहे. जिल्हा न्यायाधीशांनी दोन परस्परविरोधी आदेश दिल्याचेही ते म्हणाले.