भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून बुधवारी रीतसर निमंत्रण देण्यात आले. २२ जानेवारी २०२४ला हा भव्य आणि देखणा सोहळा पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे निमंत्रण प्राप्त झाल्यावर आपल्या भावना एक्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या. आजचा दिवस भावभावनांचा आहे. अशा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळते आहे, हे माझे अहोभाग्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे ही वाचा:
इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला
बेस्ट गरबाचे पारितोषिक जिंकले, मात्र आयोजकांनी केली पित्याची हत्या
धुळ्यात टिपू सुलतानाचा पुतळा; आमदार फारुक शाहविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!
निलेश राणेंच्या राजकीय निवृत्तीवर मंत्री रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट!
पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर प्रतिक्रिया व्यक्त केली की, आजचा दिवस हा संपूर्णपणे भावनिक आहे. आताच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी माझ्या भेटीसाठी माझ्या निवासस्थानी आले होते. श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मला त्यांनी रीतसर निमंत्रण दिले. हे माझे अहोभाग्य आहे. अशा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची भाग्य मला लाभते आहे हे माझे नशीब आहे.
रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी बुधवारी सांगितले की, प्रभू श्रीरामाची मूर्ती श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येईल. हा कार्यक्रमा २२ जानेवारीला पार पडेल. आज ट्रस्टच्या अन्य सदस्यांसह आम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. आम्ही त्यांना श्रीराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. २२ जानेवारी ही प्राण प्रतिष्ठेची तारीख निश्चित झाली आहे.
२०१९मध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्माणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखविला. त्यानंतर केंद्र सरकारने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. त्यांना या मंदिर निर्माणासंदर्भातील सर्व अधिकार आहेत. सध्या या मंदिर निर्माणाचे काम वेगाने सुरू असून अत्यंत सुंदर आणि भव्य मंदिर उभे राहात आहे. त्यासाठी स्तंभ, कमानी यांची तयारी सुरू आहे. अशा या मंदिरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती हे सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र असणार आहे. ५ ऑगस्ट २०२०ला श्रीराम मंदिराची पायाभरणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. त्यानंतर करोनाच्या काळातही मंदिरनिर्माण काम थांबले नाही. त्यानंतर अवघ्या ३ वर्षात हे मंदिर उभे राहात आहे.
गेली अनेक दशकांपासून राम मंदिराचा प्रश्न भिजत पडला होता. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातच हा प्रश्न सुटला आणि मंदिरनिर्माणाचा मार्ग मोकळा झाला.