इतिहासातील इतर नायकांपेक्षा छत्रपती शिवराय अद्भूत!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश, रायगडावर मोदींचा संदेश ऐकविण्यात आला

इतिहासातील इतर नायकांपेक्षा छत्रपती शिवराय अद्भूत!

स्वराज्याच्या राजधानीत म्हणजे रायगडावर शिवरायांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पडला. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधत शुभेच्छा संदेश दिला. त्यावेळी महाराजांची महतीही त्यांनी सांगितली.

ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आक्रमकाचा मुकाबला केला नाही तर स्वत:चे राज्यही आपण उभारू शकतो, हा विश्वास शिवरायांनी दिला. त्यांनी गुलामीची मानसिकता संपविली. राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित केले. आम्ही हेदेखील पाहिले की, इतिहासात असे शासक झाले ज्यांच्याकडे सैन्याची ताकद होती. पण प्रशासनिक ताकद कमी होती. पण असेही काही राजे होते ज्यांची शासनव्यवस्था उत्तम होती पण सैन्यनेतृत्व कमकुवत होते. मात्र पण छत्रपतींचे व्यक्तित्व अद्भूत होते. महाराजांनी स्वराज्य आणि सुराज्यही साकारले. ते शौर्यासाठीही ओळखले जातात तसेच सुशासनासाठीही. किल्ल्यांना जिंकून कमी वयात त्यांनी सैन्यनेतृत्वाचा परिचय दिला. राज्याच्या अनुषंगाने लोकप्रशासनात सुधारणा केल्या सुशासनाची पद्धत दाखवून दिली. आक्रमकांशी राज्य व संस्कृतीचे रक्षण केले. व राष्ट्रनिर्माणाचे ध्येय ठेवले. म्हणूनच इतिहासातील इतर नायकांपेक्षा ते वेगळे आहेत. लोककल्याणकारी चरित्र समोर ठेवले जगण्याचा विश्वास दिला, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचे वर्णन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या संदेशाची सुरुवात केली. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांची पवित्र भूमी असलेल्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील माझ्या बंधूभगिनींना माझे कोटी कोटी वंदन. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात शिवरायांचा राज्याभिषेकाचा दिवस नवा ऊर्जा घेऊन आला आहे. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा!

मोदी म्हणाले की, राज्याभिषेकाचा ३५० पूर्वीचा कालखंड एक उद्भूत अध्याय आहे. इतिहासात महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य, सुशासन यांची महान गाथा आम्हाला प्रेरित करते. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण महाराजांच्या शासनव्यवस्थेची पायाभूत तत्वे राहिली आहे. छत्रपतींच्या चरणी कोटी कोटी नमन करतो. आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगडच्या किल्ल्याच्या परिसरात शानदार आयोजन केले गेले आहे. महाराष्ट्रात आजचा दिवस महोत्सवाच्या रूपात साजरा केला जात आहे. वर्षभर महाराष्ट्रात या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल.

मोदींनी सांगितले की, ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा स्वराज्याचा जयघोष, जयजयकार केला गेला. त्यांनी नेहमी भारताची एकता आणि अखंडतेला सर्वोपरि ठेवले. एक भारत श्रेष्ठ भारत यातही शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे.

हे ही वाचा:

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निधी सिंगची कमाल

दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधानांना भेटणार!

निफाडमध्ये लव्ह जिहाद, मुलीला अजमेरला पळवले

सन २०२७पर्यंत जीडीपीमध्ये भारत जगभरात अव्वल तीनमध्ये येणार

शेकडो वर्षांच्या गुलामीने देशवासियांचा आत्मविश्वास नष्ट केला होता. आक्रमकांच्या शोषण तसेच गरिबीने समाजाला दुबळे केले होते. मनोबल तोडण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी लोकांमध्ये आत्मविश्वास जागवणे हे कठीण कार्य होते पण  महाराजांची स्वराज्य धर्म, संस्कृती व आपला परंपरेला धक्का देणाऱ्यांना सज्जड इशारा दिला. त्यामुळे आत्मनिर्भरतेची भावना जागृत झाली व राष्ट्राचा सन्मान वाढला. शेतकऱ्यांचे कल्याण, महिलांचे सशक्तीकरण असो. त्यांच्या शासनप्रणाली व नीती आजही प्रासंगिक आहे. महाराजांच्या जीवनाचे इतके पैलू आहेत की, त्यांचे जीवन आम्हाला प्रभावित करते. भारताचे सागरी सामर्थ्यही महाराजांनी ओळखले. नौदलाचा विस्तार केला. तेही प्रेरणादायी आहे. जलदुर्ग आजही दिमाखाल उभे आहेत. राज्याचा विस्तार करताना अनेक किल्ले बांधले.  जलसंधारण व्यवस्थाही उभ्या केल्या. त्या कुतुहल निर्माण करणाऱ्या आहेत. नौदलाच्या ध्वजावरील इंग्रजाची ओळख मिटवून महाराजांच्या राजमुद्रेला प्राधान्य देण्यात आले, ते त्यामुळेच.

Exit mobile version