अयोध्येत तयार झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबत देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाची विशेष तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री रामजन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट आणि जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. पंतप्रधान मोदींनी एकूण ६ टपाल तिकिटे जारी केले आहेत.
पंतप्रधान मोदींकडून जारी करण्यात आलेल्या सहा टपाल तिकिटांमध्ये राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माँ शबरीची तिकिटे समाविष्ट आहेत.तसेच तिकीटांमध्ये राम मंदिर, चौपई ‘मंगल भवन अमंगल हरी’, सूर्या, सरयू नदी आणि मंदिराच्या आजूबाजूच्या मूर्तींचे चित्रण आहे.भारत आणि अमेरिकेसह एकूण २१ देशांमध्ये भगवान रामावरील टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणवर पुन्हा दहशतवादी हल्ला
अफगाणिस्तानला पराभूत करून रोहित शर्माने मिळवले मोठे यश
अयोध्येला एटीएस कमांडोचे सुरक्षा कडे
जया शेट्टींनी कबड्डीचीच नव्हे तर अनेक खेळांची केली सेवा!
पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ ट्विट केला.पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज राम मंदिराशी संबंधित ६ स्मारक टपाल तिकिटे जारी करण्यात आली.तसेच भगवान श्री राम यांच्याशी संबंधित टपाल तिकिटांचा अल्बम( पुस्तक) प्रकाशित करण्यात आले आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पोस्टल स्टॅम्प ही मोठ्या विचारांची छोटी बँक आहे. टपाल विभागाला संतांचे मार्गदर्शन लाभले. टपाल तिकिटे कल्पना आणि ऐतिहासिक क्षण कॅप्चर(टिपतात) करतात. टपाल तिकिटे पुढच्या पिढीला संदेश देतात. मी देशातील जनतेचे आणि जगभरातील सर्व राम भक्तांचे अभिनंदन करू इच्छितो, असे पंतप्रधान आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाले.
दरम्यान, २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.मंदिराच्या गर्भगृहात प्रभू रामाची मूर्ती ठेवण्यात आली आहे.वेगवेगळे विधी पार पाडले जात आहेत.पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामांचा अभिषेक होणार आहे.