११ व्या शताब्दीत गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागढ येथे उभारण्यात आलेल्या कालिका माता मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केले. ५०० वर्षांनी या मंदिराच्या शिखरावर हिंदुत्वाची पताका फडकली. तब्बल ५०० वर्षांनी हे मंदिर देशाला समर्पित केले असले तरी याचा इतिहास लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण हा इतिहास लक्षात घेतल्यावर आज लाखो भाविकांना या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर आनंद आणि समाधान का वाटते आहे हे लक्षात येते.
१५व्या शतकात सुल्तान मेहमूद बेगडा याने चंपानेरवरील हल्ल्यादरम्यान या मंदिरावर हल्ला केला होता आणि या मंदिराचा कळस उद्ध्वस्त केला होता. शिवाय तिथे त्याने पीर सदनशाह यांचा दर्गा उभारला. इतकी वर्षे या शिखरावर दर्ग्याच्या व्यवस्थापनाचा कब्जा असल्यामुळे तिथे मंदिराचा ध्वज फडकावणे शक्य होत नव्हते. पण त्यानंतर दर्गा कमिटीशी चर्चा करण्यात आली आणि त्यांनी मंदिराचा तो कळस पताका फडकाविण्यासाठी खुला करावा लागला.
कालिका मंदिराचे विश्वस्त अशोक पंड्या यांनी सांगितले की, या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. चंपानेर पावागढ पुरातत्त्व विभागाने या मंदिराला महत्त्वाचे स्थान दिले आहे. युनेस्कोनेही या मंदिराला जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली आहे. रोज या मंदिरात कालिका मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोक जात असतात. आता या मंदिराच्या सौंदर्यीकरणावर १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात मंदिराचे सौंदर्यीकरण झाले आहेच पण पायऱ्याही रुंद करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
दिव्यत्त्वाने नटलेली भारतीय संस्कृती
‘अग्निपथ’ला आग लावण्याचे काम कोणाचे?
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी अग्निपथ योजनचे केले समर्थन
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन तुरुंगातच राहणार, जामीन अर्ज फेटाळला
त्या मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पताका फडकाविण्यात आली. त्याशिवाय, जवळपास २१ हजार कोटींच्या विविध उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये करण्यात आले. त्यात सूरत, उधना, सोमनाथ, साबरमती येथील स्टेशन्सचा पुनर्विकास, रेल्वेच्या इतर योजनांचे उद्घाटन यांचा समावेश होता.