कर्मचाऱ्यांच्या मुलींनी बांधली पंतप्रधानांना राखी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधताना मुलींच्या चेहऱ्यावर होता निखळ आनंद

कर्मचाऱ्यांच्या मुलींनी बांधली पंतप्रधानांना राखी

काेविडचे निर्बंध दूर झाल्यानंतर देशभरात जाेरदार रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही आपल्या निवासस्थानी लहान मुलींसाेबत रक्षाबंधन साजरा केला. हे एक विशेष रक्षाबंधन हाेते कारण पंतप्रधानांच्या मनगटाला राखी बांधणाऱ्या या मुली म्हणजे पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या सफाई, माळी, ड्रायव्हर, शिपाई आदी विविध कर्मचाऱ्यांच्या मुली हाेत्या.

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये सफाई , माळी, ड्रायव्हर, शिपाई या विविध कर्मचाऱ्यांच्या मुली पंतप्रधानांना राखी बांधताना दिसत आहेत. एक एक करत या मुली पंतप्रधानांच्या जवळ येत आहेत त्यांना आपले नाव सांगून राखी बांधत आहेत. राखी बांधताना प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हा व्हिडीओ लाेकांना खूप आवडत आहे. त्या आधी पंतप्रधानांनी ट्विट करून देशातील जनतेला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. साेबतच या मुलींनी राखी बांधल्यानंतर या मुलींसाेबत एक खास रक्षाबंधन असेही पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे.

ही वाचा:

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे औक्षण

विधान भवनाच्या आवारात महिला पाेलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण करून राखी बांधली. महिला पाेलिसांनी संजय शिरसाट आणि दादा भुसे यांना देखील यावेळी राखी बांधली

वाघा सीमेवर जवानांना बांधली राखी

पंजाबमधील अटारी वाघा सीमेवर महिलांनी बीएसएफच्या जवानांना राखी बांधून रक्षा बंधनाचा सण साजरा केला. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्याेती यांनी भाजपचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्या निवासस्थानी राखी बांधली.

Exit mobile version