‘पोयला बौशाख’ निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

‘पोयला बौशाख’ निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

आज बंगाली कालगणेनुसार वर्षाचा पहिला दिवस असतो. आज ‘पोयला बौशाख’ बंगालमध्ये साजरा केला जातो.

या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाली जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीटरवरून या शुभेच्छा देताना बंगाली आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधील शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

कोरोनाची चेन वाढतच आहे

मुंबईच्या कमबॅकचा बंगलोर कडून ॲक्शन रिप्ले

कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

त्यांच्या सोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये त्यांनी समस्त बंगाली जनता आणि जगातील सर्व बंगाली बांधवांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच सर्वांना आरोग्य, धन, ऐश्वर्य लाभण्यासाठी प्रार्थना केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच या नववर्षात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी अशी प्रार्थना देखील केली आहे.

दोन दिवसांपूर्वी गुढी पाडवा होऊन गेला. त्यानिमित्त देखील पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांनी ट्टीट करून शुभेच्छा दिल्या होत्या.

बंगालमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बंगालच्या निवडणुकीचे चार टप्पे झाले आहेत. १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी पुढील टप्प्यातील मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तृणमुल काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच चालू आहे.

Exit mobile version