राम सेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा अशी मागणी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे राम सेतूच्या जागेवर ‘समुद्रात’ काही मीटर/ किलोमीटर अंतरावर भिंत बांधण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. राम सेतू दर्शनाचे व्यवस्थापन सक्षम नसल्याने घटनेच्या कलम १४, २१ आणि २५ द्वारे हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आलेले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२ अन्वये रिट याचिकेच्या स्वरूपात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९५८ मध्ये परिभाषित केल्यानुसार राम सेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी लखनऊ येथील अधिवक्ता अशोक पांडे यांनी केली आहे .
राम सेतूचे महत्त्व अधोरेखित करून याचिकेत त्या ठिकाणी दर्शन आणि उपासना सुरू होणे आवश्यक आहे. रामायण, श्री रामचरितमानस आणि पुराणांमध्ये (स्कंद पुराण, विष्णु पुराण, अग्नि पुराण आणि ब्रह्म पुराण) सेतू परिसरात स्नान (पवित्र स्नान) केल्याचा उल्लेख असल्याने ते हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे
आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू
विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी
कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी
या पुलाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ ४ ते४०फूट पाणी असल्याने भिंत बांधणे शक्य आहे. पुलाच्या बाजूला काही भिंत उभारण्यात यावी, हा पूल खुला झाल्यास जगभरातील लोकांना भगवान रामाच्या आदेशानुसार बांधलेल्या या पुलाचे दर्शन घेण्यासाठी धनुषकोटी (रामेश्वरम) येथे येण्याची संधी मिळेल. असेही याचिकेत म्हटले आहे.
राम सेतू हा तामिळनाडूच्या दक्षिण-पूर्व किनार्यावरील पूल आहे. हा पूल दक्षिण भारतातील रामेश्वरमजवळील पंबन बेटापासून श्रीलंकेच्या उत्तर किनार्यावरील मन्नार बेटापर्यंत जातो . रामायणात सीतेला सोडवण्यासाठी भगवान रामाने श्रीलंकेत पोहोचण्यासाठी पुलाचा उपयोग केला होता असे सांगण्यात येते.