धर्मांतर रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानात सनातन धर्म स्वीकारण्यासाठी व्यासपीठ

धर्मांतर रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानात सनातन धर्म स्वीकारण्यासाठी व्यासपीठ

धर्मांतर रोखले जाण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बिगर हिंदूंना सनातन धर्म (हिंदू) स्वीकारण्यासाठी हैदराबादचे तिरुमला तिरुपती देवस्थान एक व्यासपीठ उभारणार आहे. हिंदू धर्मातील मूल्यांचा प्रसार व्हावा आणि धर्मांतर रोखले जावे, यासाठी हे व्यासपीठ उभारले जाईल, अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानाचे विश्वस्त भुमाना करुणाकर रेड्डी यांनी दिली.

‘कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला त्याचा हिंदू धर्मावरील विश्वास जाहीर करता यावा, हिंदू देवतांवरील विश्वास व्यक्त करता यावा आणि गेल्या कित्येक शतकांपासून जगण्याचा मार्ग असलेला सनातन धर्म स्वीकारता यावा, यासाठी एक अपूर्व संधी लोकांना मिळावी, याकरिता आम्ही एक व्यासपीठ उभारण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे रेड्डी यांनी सांगितले.

तिरुपती ट्रस्टने अयोध्या राम मंदिराला व्यवस्थापनासाठी मदत करण्याचा प्रस्तावही दिला आहे. तिरुमला ट्रस्ट सध्या तिरुमला येथील वेंकटेश्वर मंदिराचे चोख नियोजन करते. अशाप्रकारे लोकांना आपले हिंदुत्व जाहीर करता यावे, यासाठी मंदिरात साकारले जाणारे हे देशातील पहिलेच व्यासपीठ असेल, असे रेड्डी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!

ललित कला केंद्राच्या वादात अभिनेते प्रशांत दामलेंनी लक्ष घालून तोडगा काढावा!

संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊतला अटक!

धर्मांतरण रोखण्यासाठी आणि सनातन धर्माचा प्रसार व्हावा, यासाठी तिरुमला ट्रस्टने पुढाकार घ्याला, असे अनेक पीठे आणि मठांचे धर्मगुरू यांनी आम्हाला सांगिल्याचेही रेड्डी म्हणाले. ‘हिंदू धर्मातील महान महाकाव्ये, वारसा, संस्कृती आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अंतर्भूत असलेली मूल्ये लोकांमध्ये, विशेषत: आजच्या तरुण पिढीमध्ये पसरवण्याची कल्पना यामागे आहे,’ असे ते म्हणाले.

Exit mobile version