गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!

गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!

उत्तरप्रदेशमध्ये एटीएसने धर्मांतर प्रकरणामध्ये एका मोठा खुलासा केलेला आहे. धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली अटक केलेले मोहम्मद उमर गौतम आणि काझी जहांगीर यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी करण्यात आली होती. यातील बहुतेक मुली या ग्रामीण भागातील आहेत. त्यातील काही मुलींचे धर्मांतर करण्यात आले होते.

ऋचा उर्फ माहिन अलीची घटना उघडकीस आल्यानंतर एटीएसने पुन्हा एकदा उमरच्या संस्थेच्या इस्लामिक दावा सेंटरमधून ३३ मुली आणि महिलांच्या यादीची आता तपासणी सुरू केलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही यादी पाहिल्यानंतर बहुतेक मुली ग्रामीण भागातील असल्याचे समजले. यात झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, गुवाहाटीसह अन्य राज्यांतील महिलांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

तौक्तेग्रस्तांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पुसली पाने

बापरे!…छातीतून आरपार गेलेली सळई शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली

कुंदन, पालांडे यांनी बारमालक, बदल्यांसाठी कोट्यवधी उकळले

तिसरी लाट तोंडावर; पण ठाकरे सरकार गाफील

एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, ३३ पैकी १२ मुली अशा मुली आहेत ज्यांनी उच्चशिक्षण घेतलेले आहे. एमबीए, बीएड, बीएससी एमएससी केलेल्या या मुलींनी शिष्यवृत्तीसह आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांचे मन वळवून त्यांचे धर्मांतर करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील या तरुणींचा अनेकदा अपमान तसेच प्रतारणा झाल्यामुळे यांचे स्वतःचे अस्तित्व कधीच सिद्ध झाले नाही. अशाच मुलींच्या मानसिकतेचा फायदा आरोपी उमर गौतम आणि जहांगीर यांनी घेतला. या मुलींना असे सांगण्यात आले की, त्यांना इस्लाममध्ये पूर्ण हक्क व संरक्षण मिळेल. त्यामुळेच या मुलींचे मन वळवून या मुलींनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला.

घाटपूर गावातील सधन शेतकरी शशी सचान यांच्या मुलीनेही धर्मांतर केलेले आहे. ही बातमी गावात पसरताच कुटूंबासहीत गावातील ग्रामस्थही हैराण झाले आहेत. मुलीच्या या कृत्यामुळे कुटुंबीय नाराज आहेत. त्यामुळेच घडलेल्या घटनेसंबंधी काहीही बोलण्यास ते तयार नाहीत. परंतु घडलेल्या घटनेची गावात मात्र अगदी जोरात चर्चा सुरु आहे. रिचाबद्दलही असेच घडलेले आहे.

कुटुंबातील व्यक्ती रिचाबद्दल बोलण्यास अजिबात तयार नाहीत. गावातील एका अरूंद बोळातील रिचाचे घर आज सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. रिचाने धर्मांतरण केली ही बातमी गावात पसरल्यानंतर, अनेकांनी तिच्या आईवडिलांना याविषयी विचारले. परंतु रिचाचा नंबर घ्या आणि तिच्याशीच बोला असे तिचे आई वडिल म्हणत आहेत. रिचा नोएडामध्ये नाबार्डमध्ये कार्यरत आहे आणि तीन वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. परंतु कुटूंबाला मात्र याबद्दल काहीच माहीत नव्हते. एलआययूच्या अधिकारी तिच्या घरी पोहोचल्यानंतर घडलेली घटना त्यांना कळली. तीन वर्षांनंतर रिचाच्या घरच्यांना ही घटना आता या जून महिन्याच्या १९ तारखेला कळली.

Exit mobile version