पीएफआयने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान

पीएफआयने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (PFI) प्रसिद्ध केलेल्या माहितीपटावरून आता वाद निर्माण झाला आहे. पीएफआयने सावरकर यांचा उल्लेख देशाचा गद्दार आणि ब्रिटिशांचे गुलाम असा केला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे लोक त्यांचे सर्व गुन्हे लपवून त्यांना नायक म्हणून सादर करत आहेत, असेही म्हटलं आहे.

या माहितीपटावरून विश्व हिंदू परिषद (VHP) आणि हिंदू महासभेने पीएफआयवर टीका केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, “जी संघटना देशविरोधी, भारतविरोधी आहे, दहशतवाद्यांचे राजे आहेत आणि ज्या पक्षाची एनआयएकडून चौकशी केली जात आहे, ती संघटना आता ‘राष्ट्रवाद’ ची प्रमाणपत्रे वितरित करत आहे.” हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले की, “वीर सावरकरांना पीएफआयने देशद्रोही म्हणणे अत्यंत निषेधार्ह आहे.”

हे ही वाचा:

तंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू

कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक

काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा

‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

पीएफआयप्रमाणे काँग्रेसकडूनही वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असतो. अनेकठिकाणी कोणतीही तथ्य, पुरावे नसतानाही सावरकरांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत लिहिले जाते, बोलले जाते. त्याविरोधात सावरकर स्मारकाच्या माध्यमातून कारवाईही करण्यात आली आहे. मध्यंतरी ‘द विक’ या नियतकालिकातही सावरकरांबद्दल एका लेखाच्या माध्यमातून निरंजन टकले यांनी खोटेनाटे लिहिल्यावरून सावरकर स्मारकाच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आला. तेव्हा या नियतकालिकाने माफी मागितली आणि सावरकरांच्या स्तुतीपर लेखही प्रसिद्ध केला.

Exit mobile version