केरळमधील बाबरी विध्वंसाच्या वर्षपूर्तीनिमित्त पॉप्युलर फ्रंट ऑफ़ इंडिया ने (पीएफआय) एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. शालेय क्रीडा कार्यक्रमात पीएफआयने मुलांना ‘मैं बाबरी हूँ’ लिहिलेले बिल्ले वितरित केले होते. असा आरोप भाजप नेते पीके कृष्णदास यांनी केला आहे. बिल्ले वाटण्याचा उद्देश बाबरी विध्वंसाची आठवण करून देण्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी भाजप नेत्याने राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाकडे तक्रार केली आहे. या शाळेत हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील अधिकाधिक मुले शिकतात, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ‘मै बाबरी हूँ’ बिल्ले वाटून या मुलांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्यावर आयोगाने कारवाई करावी, असा आरोप त्यांनी केला.
ही घटना पथनमथिट्टा जिल्ह्यातील सेंट जोसेफ हायस्कूल मध्ये घडली आहे. ही शाळा काथंगल पंचायत अंतर्गत येते. राणी मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुरेश के पिल्लई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शाळेच्या गेटवर ‘मै बाबरी हूं’चा बिल्ला वाटण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या छातीवर हा बिल्ला जबरदस्तीने लावण्यात आला होता. तपासानंतर इतर लोकांवरही कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
‘डॉक्टर आणि परिचारिकांना सौजन्याने वागण्याचे, ध्यानधारणेचे प्रशिक्षण द्या’
‘जेएनयू’त ‘फिर बनाओ बाबरी’ची उबळ
कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागाराचीच होतेय कमाई
केरळ भाजपचे अध्यक्ष सुरेंद्रन यांनी ही घटना चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. आता केरळचेही सीरिया होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अतिरेक्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच वेळी, या प्रकरणातील सीपीआय नेते आणि काथंगल पंचायतीचे अध्यक्ष बिन जोसेफ यांनी सांगितले की, एसडीपीआय सत्तेत सहभागी आहे, परंतु या प्रकरणात त्यांची कोणतीही भूमिका नाही.