देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

ज्या दिवशी पीएफआयवर बंदी घालण्यात आली. त्याच दिवशी काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुचवले. यामागचे नेमके कारण काय? असा सवाल अश्विनी उपाध्याय यांनी केला आहे.

देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयवर बंदी घातल्यानंतर यावर वादविवादही झाले. त्यात सुप्रीम कोर्टाचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत पीएफआयवर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेस पक्षावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. देशात शांतता संविधानामुळे नाही तर हिंदूंमुळे आहे, असे विधान उपाध्याय यांनी केले आहे.

अश्विनी उपाध्याय म्हणाले, लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही. तर भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच आहे.

ज्या दिवशी पीएफआयवर बंदी घालण्यात आली. त्याच दिवशी काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुचवले. यामागचे नेमके कारण काय? कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्षही होतील. परंतु, दिग्विजय सिंह म्हणजे तेच, जे पीएफआयसोबत स्टेजवर कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत, असा आरोप उपाध्याय यांनी काँग्रेसवर केला.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याआधी उधमपूर बॉम्बस्फोटाने हादरले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

आणखी एका डिलिव्हरी बॉयने तरुणीची छेड काढली

पुढे ते म्हणाले, आपण फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की पीएफआय संपली. परंतु पीएफआयचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस अध्यक्ष होणार आहे. याचा काहीतरी संबंध आहे. या देशात सुख-शांती धर्मनिरपेक्ष संविधानामुळे नाही, तर भारतातील धर्मनिरपेक्ष हिंदूंमुळेच आहे. जे पूर्वी ९० टक्के होतं, ते आता ते ७८ टक्क्यांवर आले आहे.जिथे हिंदू संपले, तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदू समूह संपषुट्ता आला, तेथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच, असंही अश्विन म्हणाले.

Exit mobile version