रुपेरी पडद्यावर उलगडणार वीर मराठ्यांची ‘पावन’गाथा

रुपेरी पडद्यावर उलगडणार वीर मराठ्यांची ‘पावन’गाथा

दिगपाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवार, १० फेब्रुवारी रोजी हा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रदर्शनानंतर अवघ्या काही मिनिटातच या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. युट्युब वर लाखो लोकांनी या ट्रेलरचा आस्वाद घेतला आहे.

३ मिनिट २२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये एकूण चित्रपट किती दमदार असणार आहे याची एक झलक पाहायला मिळते. ‘पावनखिंड’ या नावावरुनच चित्रपटाचा विषय काय आहे हे लक्षात येते पण दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी या संपूर्ण विषयाची मांडणी फारच सफाईदार पद्धतीने केली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वात मोघलांच्या फौजे विरोधात लढा देणाऱ्या या ६०० मावळ्याची विरगाथा रुपेरी पडद्यावर बघताना प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येईल.

हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र

कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड

सुरुवातीला हा चित्रपट ‘जंगजौहर’ या नावाने प्रदर्शित होणार होता. पण नंतर चित्रपटाचे नाव बदलून पावनखिंड असे करण्यात आले. तर आधी हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार होता पण कोवीडच्या दुसऱ्या लाटेत चित्रपटगृहे बंद असल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता १८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, हरीश दुधाडे, अजय पुरकर असे नामवंत कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Exit mobile version