‘ज्ञानवापी मशिदीच्या आधी त्याठिकाणी भव्य हिंदू मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व खात्याच्या (एएसआयI) च्या अहवालावरून म्हणता येईल,’ असा दावा न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी गुरुवारी केला.
‘मशिदीची पश्चिम भिंत ही हिंदू मंदिराचा भाग आहे. यातील खांबांवर देवनागरी, तेलूगू आणि कन्नड भाषेतील ३२ शिलालेख आढळल्याचे तसेच, खांबांवरून प्रतीके नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे,” असे जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. ज्ञानवापी मशिदीबाबतच्या पुरातत्त्व खात्याने दिलेल्या अहवालाची प्रत ११ जणांनी मागितली आहे. त्यात हिंदू व मुस्लिम बाजूंच्या पक्षकारांचा समावेश आहे.
या अहवालात हनुमान, श्रीगणेश आणि नंदी यांच्या भंग पावलेल्या मूर्ती दिसून येत आहेत. शिवलिंगाचेही भग्नावशेष दिसून येत आहेत. शिवाय, त्यात काही जुनी नाणीही सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. ८३९ पानांच्या या अहवालातून ज्ञानवापी मशीद ही तिथे तेव्हा अस्तित्वात असलेली मंदिरांच्या भग्नावशेषांवर बांधण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे, असाही दावा करण्यात आला आहे.
एसआयचा अहवाल, ज्यामध्ये ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) सर्वेक्षण समाविष्ट आहे, त्या जागेवरील ऐतिहासिक स्तरांबद्दल प्रश्न आहेत. जैन यांच्या म्हणण्यानुसार, सध्याची रचना पूर्व-अस्तित्वात असलेल्या रचनेवर बांधलेली दिसते.
‘एएसआयच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, मशिदीमध्ये खांब आणि प्लास्टरचा पुनर्वापर करून किरकोळ बदल करण्यात आले आहेत. हिंदू मंदिरातील काही खांब नवीन रचनेत वापरण्यासाठी किंचित बदल करण्यात आले आहेत. खांबावरील कोरीव काम काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’ असे जैन यांनी एएसआयच्या अहवालाचा हवाला देऊन सांगितले.
हे ही वाचा:
प्रजासत्ताक दिनी महिला शक्तीचे दिसले सामर्थ्य
मोइज्जू यांना झाली जुन्या मैत्रीची आठवण, प्रजासत्ताक दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा!
हबल दुर्बिणीने शोधला सूर्यमालेबाहेरील पाण्यासह एलियन ग्रह!
वेंकय्या नायडू, चिरंजीवी, वैजयंतीमाला यांना पद्मविभूषण
‘एएसआयने असे म्हटले आहे की, सर्वेक्षणादरम्यान, विद्यमान आणि अस्तित्वात असलेल्या संरचनेवर अनेक शिलालेख आढळून आले आहेत. सध्याच्या सर्वेक्षणादरम्यान एकूण ३४ शिलालेखांची नोंद करण्यात आली होती आणि ३२ शिक्का असलेली पृष्ठे घेण्यात आली होती,’ असे जैन यांनी सांगितले.
‘हे खरे तर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराच्या दगडावरील शिलालेख आहेत जे विद्यमान संरचनेच्या बांधकाम आणि दुरुस्तीदरम्यान पुन्हा वापरण्यात आले आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
‘संरचनेतील पूर्वीच्या शिलालेखांच्या पुनर्वापरावरून असे सूचित होते की पूर्वीच्या वास्तू नष्ट झाल्या होत्या आणि त्यांचे भाग सध्याच्या संरचनेच्या बांधकाम दुरुस्तीमध्ये पुन्हा वापरण्यात आले होते. या शिलालेखांमध्ये जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर अशी तीन देवतांची नावे आढळतात,’ असे त्यांनी सांगितले.