देशात सध्या ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत असताना आता देशातील अनेक मशिदींच्या खाली मंदिरांचे अवशेष असल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्लीमधील जामा मशिदीच्या खालीही मूर्ती सापडतील असा दावा करण्यात येत आहे. यादरम्यान, दिल्लीमध्ये सोमवार, ३० मे रोजी वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसात जामा मशिदीच्या मुख्य घुमटाचा कळस कोसळल्याची घटना घडली आहे. यासजे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
दिल्लीमधील जामा मशिदीच्या मुख्य घुमटावरील कलश कोसळला आहे. या कळसाचे वजन जवळपास ३०० किलो आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. देवानेच जामा मशीद तोडायला सुरुवात केली आहे, असं काहींचे म्हणणे आहे. तर काहींच म्हणणं आहे की, मशीद स्वतःच ढासळत आहे. तर काही जण दिल्लीची ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अजून हे प्रकरण न्यायालयातही गेलेलं नाहीये आणि मशीद ढासळायला सुरुवात झाली अशा प्रतिक्रिया लोक सोशल मीडियावर देत आहेत.
दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जामा मशीदीसह त्या परिसरातील इतर वास्तूंचेही नुकसान झाले आहे. तर, शहरातील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे.
हे ही वाचा:
‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’
नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने सहा मुलांना ढकलले विहिरीत
माजी मंत्र्यांच्या घरात घुसून मागितली खंडणी
वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेली ज्ञानवापी मशिद ही ती मशिद नसून ते मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मशिदीचा सर्व्हे करण्यात आला. त्यात शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षातर्फे करण्यात आला तर हे शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून करण्याता आला. सध्या हा संपूर्ण परिसर न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. पण आतील भागाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जिथे वजूखाना असे म्हटले जाते तिथे हे शिवलिंग आहे.