प्रभू रामाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक अयोध्येत येत आहेत.या प्रवाहात पाकिस्तानातील सिंधी समाजाचे २०० सदस्य आज शुक्रवारी (३ मे) अयोध्येतील प्रभू राम मंदिराला भेट देणार आहेत. ते सर्व पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहेत. सिंधी समाजाचे हे शिष्टमंडळ एका महिन्याच्या धार्मिक सहलीसाठी भारतात आले आहेत. भारतातील सिंधी समाजाचे १५० सदस्यीय शिष्टमंडळही त्यांच्यासोबत या दौऱ्यात आहे. हे सर्वजण प्रयागराजहून रस्त्याने अयोध्येला पोहचणार आहेत.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, शरयू घाटावर बांधण्यात आलेल्या राम की पौरी या ठिकाणी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात येणार आहे. येथे सर्वांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था राष्ट्रीय सिंधी विकास परिषदेचे सदस्य विश्व प्रकाश रुपन यांनी सांगितले की, हे शिष्टमंडळ प्रयागराजहून बसने अयोध्येला पोहोचेल.
हे ही वाचा:
कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आणि…
मोदी म्हणतात, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, ही बाळासाहेबांना श्रद्धांजली
राहुल गांधी रायबरेलीतून लढणार; अमेठीतून केएल शर्मा रिंगणात
मिळालेल्या माहितीनुसार, शिष्टमंडळाचा पहिला मुक्काम भारत कुंड या ठिकाणी असेल. त्यानंतर सर्वजण गुप्तर घाटाकडे जातील. शिष्टमंडळासाठी अयोध्येतील उदासीन ऋषी आश्रम आणि शबरी रासोई या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.ते शुक्रवारी संध्याकाळी राम की पैडी येथील सरयू आरतीलाही उपस्थित राहतील, त्यावेळी चंपत राय यांच्यासह राम मंदिर ट्रस्टचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
अयोध्येतील सिंधी धाम आश्रमातही एका विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, जेथे देशभरातील विविध सिंधी संघटना शिष्टमंडळाचे स्वागत करतील. त्याच्यासोबत संत सदा राम दरबार रायपूरचे प्रमुख युधिष्ठिर लाल देखील असणार आहेत.अयोध्या दौऱ्यानंतर हे शिष्टमंडळ लखनौला रवाना होणार आहे.