भारतामध्ये सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना शुभेच्छांचा वर्षावही होत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाज दानिश कनेरिया यानेही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून लवकरच अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचे त्याने ट्विट करत म्हटले आहे.
२४ ऑक्टोबरला सकाळी केलेल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, जय श्रीराम. जगभरातील सर्वांना हॅप्पी दिवाली. श्री राम मंदिराला भेट देण्याची माझी इच्छा असून मी लवकरच भारतात येईन.
Jai Shree Ram happy Diwali to all around the Globe .My aim is to visit RAM Mandir Ram Bhagwan I will come
— Danish Kaneria (@DanishKaneria61) October 24, 2022
दानिश कनेरिया हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज आहे. त्याने हे ट्विट केल्यानंतर त्याचे स्वागत करणाऱ्या असंख्य प्रतिक्रिया आल्या. ट्विटरवरील एका अमित पांडेने म्हटले आहे की, हॅप्पी दिवाली दानिश कृपाशंकर भाई. लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा असू दे आणि तुम्हाला सर्वप्रकारचे सौख्य लाभू दे. जय श्रीराम
हे ही वाचा:
जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद
हिंदू परंपरा मानणारे आणि त्यांचे पालन करणारे ऋषी सुनक
ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी
विराटच्या ऑस्ट्रेलियातील तुफान फटकेबाजीमुळे भारतात खरेदी थांबली
एकाने म्हटले आहे की, तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना हॅप्पी दिवाली. तुम्ही अयोध्येला भेट द्यावी अशी श्रीरामाचीही इच्छा आहे. श्रीरामाचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत आहेत.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येचा दौरा केला आणि तिथे लक्ष लक्ष दिव्यांनी हा परिसर उजळून गेला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेलही तिथे उपस्थित होत्या.
दानिश कनेरिया हा पाकिस्तानी संघातून खेळला असला तरी तो हिंदू असल्यामुळे संघातील खेळाडूंकडून त्याची हेटाळणी होत असे. पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्नही केला. दानिश कनेरियाने त्याआधी असे जाहिररित्या सांगितलेही होते की, त्याच्या संघसहकाऱ्यांनी त्याला नेहमी वाईट वागणूक दिली आणि तो हिंदू असल्यामुळे त्याच्याशी ते बोलतही नसत.
कनेरिया हा सर्वाधिक बळी मिळविणारा पाकिस्तानातील फिरकी गोलंदाज ठरला. त्याच्याआधी वासिम अक्रम, वकार युनूस, इम्रान खान या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक बळी घेतले होते.