विवेक अग्निहोत्रींचे कार्यक्रम केम्ब्रिज, ऑक्सफर्डने केले रद्द

विवेक अग्निहोत्रींचे कार्यक्रम केम्ब्रिज, ऑक्सफर्डने केले रद्द

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

द काश्मीर फाइल्स या चित्रपटामुळे जगभरात लोकप्रियता मिळविलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना युरोप दौऱ्यावर विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यांचे तेथे आयोजित केलेले कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले. त्यावरून त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून आपली ही नाराजी बोलून दाखविली.

ते म्हणतात की, मी सध्या युरोपात आहे. मानवतेचा संदेश देणारा हा दौरा आहे. केम्ब्रिज विद्यापीठ, जर्मनी, नेदरलँड्स, ऑक्सफर्ड, ब्रिटिश पार्लमेंट येथे मला आमंत्रण आहे. काल एक आश्चर्यजनक घटना घडली. मी जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठात गेलो. तेव्हा तिथे मला सांगण्यात आले की, तुम्हाला व्हीडिओ रेकॉर्डिंग करता येणार नाही. हे १०० टक्के अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन होते. कारण तेथील काही पाकिस्तानी व काश्मिरी मुस्लिमांनी आमच्याविरोधात निदर्शने केली. हे फॅसिस्ट वृत्तीचे लक्षण आहे. मी लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करतो, म्हणूनच माझ्याबाबतीत हे झाले आहे. हे तेच विद्यापीठ आहे, जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शिक्षण घेतले होते.  पण त्यांच्या १५०व्या जयंतीदिनानिमित्तचा कार्यक्रमही इथे रद्द करण्यात आला कारण ते फॅसिस्ट होते असा आरोप करत कार्यक्रम रद्द केला गेला.

हे ही वाचा:

आसाममध्ये ‘योगी स्टाईल’ एन्काऊंटर…

मुंबईत प्रत्येक बुधवारी ‘नो हॉकिंग डे’

कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक

हार्दिक पटेल करणार भाजपामध्ये प्रवेश

त्यानंतर मी ऑक्सफर्ड विद्यापीठात जाणार होतो. ऑक्सफर्ड युनियनने मला बरेच आधी आमंत्रण दिले होते. पण नंतर त्यांच्याकडून संपर्क करण्यात आला की, आम्हाला माफ करा आमच्याकडे बुकिंगचा घोळ झालेला आहे. आणखीही कुणाचे तरी बुकिंग आहे तेव्हा आपण आज तुमचा हा कार्यक्रम न करता तो नंतर तुमच्या सवडीप्रमाणे करू. शिवाय, मला न विचारताच त्यांनी १ जुलैला कार्यक्रमाची तारीखही ठरवून टाकली. खरे तर १ जुलैला तिथे विद्यापीठात कुणीही विद्यार्थी येणार नसल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करण्याला काही अर्थ नव्हता.

यावरून हे लक्षात येते की, त्यांना आम्हाला फॅसिस्ट ही उपाधी लावायची आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारला विरोध करायचा आहे.

आम्ही जी काश्मीर फाइल्स ही फिल्म बनवली त्यात हजारो काश्मिरी पंडितांच्या अत्याचाराला वाचा फोडली, ती फिल्म खरे हिंदूफोबिक नाही तर अशी फिल्म बनवणे हे इस्लामोफोबिक आहे, असा निष्कर्ष यांनी काढला.

ते आमचे हे कार्यक्रम रद्द करत असले तरी ते खऱ्या अर्थाने काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतात. हिंदू धर्मीय हे या विद्यापीठात अल्पसंख्य आहेत तेव्हा त्यांचे खच्चीकरण करण्याचा हा या विद्यापीठांचा प्रयत्न आहे. याच विद्यापीठांनी इंदिरा गांधी, बेनझीर भुट्टो यांच्यासारख्या फॅसिस्ट लोकांना इथे आमंत्रित केले आहे. मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, न्यायालयात दाद मागणार आहे.

Exit mobile version