प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन

प्रसाद प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन

प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील आधीच्या वायएसआर काँग्रेस (वायएसआरसीपी) सरकारवर आरोप करत धक्कादायक खुलासा केला. वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात श्री व्यंकटेश्वर मंदिरात ‘प्रसाद’ म्हणून दिले जाणारे तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट घटकांचा वापर केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून देशभरात हा मुद्दा चर्चेत असून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशानंतर, प्रसादामधील अशुद्धता दुरुस्त करण्यासाठी सोमवार, २३ सप्टेंबर रोजी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’ म्हणजेच होमचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या शुद्धीकरणासाठी, हा होम श्रीवारी (श्री व्यंकटेश्वर) मंदिरातील बंगारू बावी (गोल्डन विहीर) यज्ञशाळेत (विधीस्थळ) आयोजित केला जातो.

लाडूमध्ये असलेल्या भेसळीनंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकारने आता या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचे निरीक्षण महानिरीक्षक (IG) किंवा त्याहून अधिक दर्जाचे अधिकारी करतील. एसआयटी सत्तेचा गैरवापरासह सर्व कारणांची चौकशी करेल. चौकशीअंती अहवाल शासनाला सादर केला जाईल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, लाडू भेसळीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार याबाबत कठोर कारवाई करेल.

हे ही वाचा : 

अमेरिका- इंडिया ही नव्या जगाची ‘एआय’ शक्ती

फाळणी दरम्यान हिंदूंच्या जमिनी वक्फ बोर्डाने जबरदस्ती बळकावल्या, अन काँग्रेसने अधिकृत प्रमाणपत्र दिले!

आरडाओरडा करणाऱ्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याची मागणी

तिकिटासाठी इच्छुक सपा खासदाराच्या मुलावर मारहाण-अपहरण प्रकरणी गुन्हा !

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केला आहे की, नियमांनुसार तूप पुरवठा करणाऱ्यांना किमान तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. मात्र, जगन मोहन रेड्डी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर ही अट एक वर्षाची झाली. पुरवठादारांसाठी आवश्यक असलेली उलाढाल देखील २५० कोटींवरून १५० कोटींवर आणली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पामतेलही यापेक्षा महाग असताना ३१९ रुपये किलोने शुद्ध तूप कसे उपलब्ध होऊ शकते, असा सवाल चंद्राबाबू नायडू यांनी केला.

Exit mobile version