28 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरधर्म संस्कृतीमॉल्स, दुकानांमध्ये ख्रिसमस ट्रीप्रमाणे राम मंदिराची प्रतिकृती ठेवा

मॉल्स, दुकानांमध्ये ख्रिसमस ट्रीप्रमाणे राम मंदिराची प्रतिकृती ठेवा

इंदूरच्या महापौरांनी काढले निवेदन

Google News Follow

Related

मध्य प्रदेशमधील इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एक आदेश जारी केला आहे. त्यांच्या निर्णयामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. याचा उत्साह देशभरात आहे. याचं पार्श्वभूमीवर इंदूरमधील सर्व मॉल्स आणि शहरातील दुकानदारांना अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती दर्शनी भागात लावण्याचे आदेश पुष्यमित्र भार्गव यांनी दिले आहेत. तसेच जे दुकानदार या निर्णयांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करावी, असेही ते म्हणाले आहेत.

महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी शहरातील सर्व दुकानदार आणि मॉलमधील प्रशासनाला एक पत्र पाठविले आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, “१५ जानेवारी ते २२ जानेवारी या आठवड्यात राम मंदिर लोकार्पणानिमित्त राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात यावी. जर २५ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत दुकानदार आपल्या दुकानात सांताक्लॉज आणि ख्रिसमस ट्री ठेवू शकतात तर राम मंदिराची प्रतिकृती आठवडाभर ठेवण्यास काही अडचण नसली पाहीजे. जे लोक या निर्णयाला सहकार्य करणार नाहीत. त्या लोकांना काय उत्तर द्यायचं हे इंदूरच्या लोकांना चांगलंच ठाऊक आहे. हे प्रभू रामासाठी करायचं आहे. हे रामराज्यासाठी आहे. त्यामुळे याचा कुणी विरोध करेल, असे मला वाटत नाही,” असंही पुष्यमित्र भार्गव म्हणाले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंची चिडचिड; अटल सेतू बांधला पण अटलजींचा फोटो कुठे होता?

भारतातील सर्वात लांब सागरी सेतूबद्दल हे तुम्हाला माहिती आहे का?

‘ही तर पवित्र स्वप्नाची परिपूर्ती’

भूत पिशाच निकट नही आवे…

पुष्यमित्र भार्गव यांचा इंदूरमध्येच जन्म झाला असून भार्गव यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय, स्कूल ऑफ लॉ, इंदूर येथून शिक्षण घेतले आहे. मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्यून त्यांनी सायबर लॉचा डिप्लोमा केला आहे. तसेच अलाहाबाद विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले आहे. विद्यार्थीदेशत असताना भार्गव भाजपाशी संबंधित असेलल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. राजकारणात येण्यापूर्वी पुष्यमित्र भार्गव हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे सर्वात तरूण अतिरिक्त महाधिवक्ता होते. २०२२ साली झालेल्या महापौर निवडणुकीत भार्गव यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १ लाख ३२ हजार ९५६ मतांनी पराभव केला. त्यांच्या विजयामुळे इंदूर शहराला सर्वात कमी वयाचा महापौर मिळाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा