हिंदू देवतांच्या मूर्तींची वास्तविकता तपासण्यासाठी ताजमहालमधील २२ बंद दरवाजे उघडावेत. दरवाजे उघडून त्याची तपासणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत तथ्य शोध समितीची स्थापना आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, हिंदू देवतांच्या मूर्ती बंद दरवाजाआड बंदिस्त आहेत. या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांनी हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याच्या दाव्यांचाही उल्लेख केला आहे.
काही हिंदू गट आणि प्रतिष्ठित संत हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याचा दावा अनेक इतिहासकारांनी केले आहेत आणि वस्तुस्थितीही आहे. परंतु अनेक इतिहासकार याला मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल मानतात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, तेजोमहाल हाच ताजमहाल एक आहे. ज्योतिर्लिंग म्हणजेच उत्कृष्ठ शिव मंदिर असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. पुढे या याचिकेत म्हटले आहे की, हे आदरपूर्वक सादर केले जाते की, चार मजली इमारतीच्या वरच्या आणि खालच्या भागात अंदाजे २२ खोल्या आहेत. ज्या कायमस्वरूपी बंद आहेत आणि पी एन ओक सारख्या अनेक इतिहासकार आणि करोडो हिंदू उपासकांचा असा ठाम विश्वास आहे की त्यामागे मंदिर आहे. भगवान शिव तेथे आहेत.
हे ही वाचा:
तारापूरमध्ये स्टील कारखान्याच्या कामगारांवर जमावाचा हल्ला, १९ पोलीस जखमी
कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग
म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत
‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’
परंतु, ताजमहालमधील दरवाजे बंद करण्यामागील कारणाबाबत ASI कडे दाखल केलेल्या आरटीआयचा हवाला देऊन, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, आग्रा यांनी दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव ते दरवाजे बंद आहेत.