ठरलं! या दिवशी श्री राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली माहिती

ठरलं! या दिवशी श्री राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी कधी खुले केले जाणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला यासंबंधी माहिती दिली. या तारखांबद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते.

अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी ‘एबीपी न्यूज’ला याविषयी सांगितले. १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आगामी वर्षात १५ ते २४ जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले जाईल. तसेच प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले केले जातील. २४ जानेवारी किंवा २५ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज

ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता

‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराला आर्थिक रसद?

असे असेल प्रभू श्रीरामांचे मंदिर

गर्भगृहाचा मुख्य दरवाजा सोन्याने मढवला जाणार असून त्यावर सोन्याचे नक्षीकाम असणार आहे. मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावरही सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार आहे.

Exit mobile version