28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरधर्म संस्कृतीरामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत रामभक्तांची अलोट गर्दी

रामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत रामभक्तांची अलोट गर्दी

राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येत प्रथमच रामनवमी साजरी

Google News Follow

Related

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजऱ्या होणाऱ्या रामनवमीचा देशभरात उत्साह दिसून येत आहे. यंदा प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच राम मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मोठ्या संघर्षानंतर प्रभू श्री रामांचे भव्यदिव्य असे मंदिर अयोध्या नगरीत उभे राहिले आहे. २०२४ मध्ये श्री राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येत प्रथमच यंदा रामनवमी साजरी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक अयोध्ये नगरीत दाखल झाले आहेत. यानिमित्ताने संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. याशिवाय दर्शनाची वेळही वाढवण्यात आली आहे. दुपारी १२.१६ वाजता सूर्य टिळक होणार आहे.

हे ही वाचा:

कोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी

विहिंप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन दहशतवाद्यांना अटक

शाळेत नमाज पढू द्या म्हणून लंडनमध्ये विद्यार्थीनीची याचिका, न्यायालयाने खडसावले!

ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत नऊहून अधिक राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार

अयोध्येतील राम मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय राम नवमीसाठी अयोध्येत येणाऱ्या भक्तांसाठी विशेष ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. रामजन्मभूमी परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच सुंदर रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम नवमीनिमित्त आलेले भाविक शरयू नदीत स्नान करुन रामभक्त रामल्लाचे दर्शन घेत आहेत. रामनवमीनिमित्त अयोध्येत आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. राम की पैडी, रामकोट, सरयू बीच, धरमपथ, रामपथसह रामजन्मभूमी संकुलात पुष्पवृष्टी करून रामनवमी साजरी केली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा