केरळच्या मंदिरात आता झुलणार रोबोटिक हत्ती

या यांत्रिक हत्तीची उंची साडे दहा फूट असून त्याचे एकूण वजन ८०० किलो आहे.

केरळच्या मंदिरात आता झुलणार रोबोटिक हत्ती

केरळच्या कोणत्याही मंदिरात गेलात तर मंदिर परिसरात हत्ती हमखास दिसतो. केरळमध्ये धार्मिक कार्यक्रमात हत्तीचा सहभाग हा महत्वाचा असतो. केरळमधील ही प्राचीन परंपरा आहे. पण आता यापुढे हे हत्ती दिसणार नाहीत. केरळमधील त्रिशूरच्या प्रसिद्ध इरिंजदापल्ली श्री कृष्णाने पूजा-उत्सवात हत्तीचा उपयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे.आता लवकरच इतर मंदिरेही असे पाऊल उचलतील अशी आशा मंदिर समितीने व्यक्त केली आहे. या हत्तीच्या ऐवजी आता येथे रोबोट हत्ती बघायला मिळणार आहे.

केरळच्या मंदिरांमध्ये केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींमध्ये हत्तीला खूप महत्त्व आहे. पण बऱ्याचदा हे हत्ती धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी किंवा त्याआधी पिसाळल्यासारखे करतो.यामुळे अनेकवेळा अनेकांना जीव गमवावा लागला आहे.त्यामुळेच त्रिशूरच्या इरिंजदापल्ली श्रीकृष्ण मंदिर समितीने धार्मिक विधींसाठी हत्तींचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता.

प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या पेटा इंडिया संस्थेच्या म्हणण्यानुसार कैदेत ठेवल्यामुळे अनेक वेळा हत्ती चिडतात. बऱ्याचदा त्यांच्या इच्छे विरोधात काम केल्यास हाती चिडतात. हेरिटेज ऍनिमल टास्क फोर्सच्या अहवालानुसार केरळमध्ये गेल्या १५ वर्षांत हत्तींच्या हल्ल्यामुळे ५२६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

या हत्तीचा होतो जास्त उपयोग

चिकत्तुकवू रामचंद्रन नावाचा हत्ती केरळच्या सणांमध्ये सर्वाधिक उपयोग केला जातो. या हत्तीने सहा माहूत, चार महिला आणि इतर तीन हत्तींसह १३ जणांचा बळी घेतला आहे. यामुळेच त्रिशूरच्या इरिन्जादापल्ली श्रीकृष्णाने पूजा-उत्सवात हत्तींचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता दिसेल रोबोट हत्ती

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील इरिन्जादापल्ली श्री कृष्ण मंदिरात आता विधीसाठी खऱ्या हत्तीऐवजी रोबोटिक हत्ती वापरण्यात येणार आहे. या  हत्तीची उंची साडे दहा फूट असून त्याचे एकूण वजन ८०० किलो आहे. या हत्तीवर चार जण स्वार होऊ शकतात. या हत्तीची सोंड, डोके, डोळे आणि कान सर्व विजेवर चालतात. रविवारी मंदिरात ‘नादायरुथल’ हा धार्मिक विधी पार पडला.या विधीचा भाग म्हणून देवाला हत्ती अर्पण केला जातो.

 

 

Exit mobile version