राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या य वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता जनताच रस्त्यावर उतरली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यात सगळीकडे सावरकरांच्या जयघोषाचा निनाद सुरु आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने राहुल गांधींविरोधात आक्रमक होत महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. ठाण्यात सुरु झालेल्या सावरकर यात्रेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात यापुढे एक शब्दही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही असा इशाराच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलतांना म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान देशात कोणीही सहन करणार नाही हाच संदेश या यात्रेतून देण्यात येत आहे. ठाण्याची गौरव यात्रा ही त्याची एक छोटीशी झलक आहे. सावरकरांबद्दल एकही शब्द कोणी ऐकणार नाही, सहन करणार नाही म्हणून ही गौरव यात्रा काढण्यात आली आहे. सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपा आणि शिवसेनेने काढली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे अनुकरण करणाऱ्यांचं मी या यात्रेत स्वागत करतो.
वीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, प्रखर हिंदुत्ववाद प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. जाणून बुजून त्यांचा त्यांच्याविरोधात बोललं जात आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ठाण्याच्या सावरकर गौरव यात्रेत आबाल वृद्ध सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात आम्ही सावरकर असे फलक होते. या फलकाच्या माध्यमातून आमच्या ह्रद्यातून सावरकरांबद्दलचा आदर कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. त्यांचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही असेच या नागरिकांनी दाखवून दिले. दादरमध्ये भाजप व शिवसेनेच्या या यात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. विद्यार्थिनीही पारंपारिक वेशभूषेत या यात्रेत सहभागी झाले आहेत. संपूर्ण वातावरण सावरकरमय झाल्याचे पाहायला मिळत होते.
हे ही वाचा:
संजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका…
प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे कालवश
अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानीचा जामीन नाकारला
सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन
दादरच्या सावरकर गौरव यात्रेत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मविआच्या छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेवर जोरदार टीका केली. वज्रमुठ ही एकीची असते. मात्र, १० ते १५ जण जेव्हा हात हातात घेऊन चालतात तेव्हा त्याला चाचपडणे म्हणतात अशी खिल्ली शेलार यांनी उडवली. आशिष शेलार म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांविरोधात जे वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना माफी मागायला लावावी याचा पुनरुच्चार शेलार यांनी केला.