एक तास आधी या, तासभर आधी निघा…बिहार सरकारची मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी रमझानची सवलत

राज्य सरकारने काढली नोटीस, प्रत्येक वर्षी आता रमझानदरम्यान ही सूट

एक तास आधी या, तासभर आधी निघा…बिहार सरकारची मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी रमझानची सवलत

आगामी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचा जोगवा मागता यावा यासाठी बिहार सरकारने रमझानसाठी मुस्लिमांना खास सवलत दिली आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुस्लिम कर्मचाऱ्यांना विशेष सवलत देताना कामाच्या वेळेत बदल केला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, मुस्लिम अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्यासाठी रमझानच्या काळात एक तास आधी येण्याची सुविधा आहे तसेच एक तास आधी ते निघू शकतात. या नोटिशीत म्हटले आहे की, मुस्लिम कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेता सरकारने रमझानच्या काळात त्यांना कार्यालयात एक तास आधी येण्याची मुभा दिली असून ते एक तास आधी कार्यालयातून निघू शकतात.

हे ही वाचा:

गोव्यातून औषाधांच्या नावाखाली बिअर आणि विदेशी दारू जप्त

अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित

वरुण गांधींकडून काही तरी शिका राहुल गांधी!

वडिलांनी चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलेल्या मुलीसाठी गुजरात पोलीस आले धावून

या नोटिशीत असेही नमूद केले आहे की, अशा प्रकारची सुविधा आता प्रत्येक वर्षी रमझानच्या काळात लागू केली जाईल. जनता दल युनायटेडचे नेते सुनील कुमार सिंग म्हणाले की, या निर्णयामुळे सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास आधी घरी जाता येईल आणि रमझानचा उपवास सोडता येईल. त्यामुळे कामावर परिणाम होणार नाही. आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही अशाच प्रकारचा निर्णय नुकताच घेतला. त्यांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास आधी कार्यालयातून निघण्याची सूट दिली होती. बिहार सरकारने जारी केलेली ही नोटीस २४ मार्चपासून लागू होईल आणि २३ एप्रिलपर्यंत ही सवलत सुरू राहील. मग अशीच सुविधा हिंदू धर्मियांच्या विविध सणांना का दिली जात नाही, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.

Exit mobile version