‘ओपेनहायमर’मधील भगवद्गीता वादानंतर ‘श्रीकृष्ण’ दिग्दर्शकाच्या पाठिशी

मुख्य व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन

‘ओपेनहायमर’मधील भगवद्गीता वादानंतर ‘श्रीकृष्ण’ दिग्दर्शकाच्या पाठिशी

ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘ओपेनहायमर’ चित्रपट त्यातील भगवद्गीतेसंदर्भातील दृश्यावरून वादात सापडला आहे. यामध्ये ओपेनहायमरची भूमिका करणारा अभिनेता सिलियन मर्फी त्याची प्रेयसी अभिनेत्री जीन टैटलोक हिच्यासोबत समागम करत असताना भगवद्गीतेतील एक ओळ उद्धृत करतो, असे दृश्य दाखवले आहे. या दृश्यावरून वादाचे मोहोळ उठले असून महाभारत मालिकेत कृष्णाची भूमिका करणारे नितीश भारद्वाज यांनी मात्र याबाबत सिनेमाच्या, त्यातील मुख्य व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन केले आहे.

 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘रणभूमीवर सांगण्यात आलेल्या गीतेमधून आपल्याला कर्माचे महत्त्व सांगितले जाते. खरी परिस्थिती सांगायची तर, आपण सगळेच आपल्या जीवनात संघर्ष करत आहोत. विशेषत: भावनिक पातळीवर. या भावनाच आपली रणभूमी आहे. श्लोक क्रमांक ११.३२ अर्जुनला यासाठी सांगण्यात आला होता की, तो एक युद्धवीराच्या भूमिकेतून रणभूमीवरील आपली जबाबदारी समजून घेईल. कारण वाईटाशी लढणे हे त्याचे काम आहे. कृष्णाच्या संपूर्ण श्लोकाला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे.’
नितीश भारद्वाज म्हणतात,‘गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की, तेच अंतिम काळ असून तेच सर्व नष्ट करतील. म्हणजे त्याला जर मारले नाही तर तो असाही मरणारच आहे. त्यामुळे तू तुझे कर्म कर.’

हे ही वाचा:

मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

टँकरमधून आरडीएक्स नेत असल्याचा खोटा फोन करणारा अटकेत

तृणमूल सरकारला सर्वोच्च दणका

अडीच वर्षात विरोधकांना ठाकरे सरकारने फुटकी कवडी दिली नाही

नितीश यांनी भगवद्‌गीतेतील या श्लोकाबाबत सांगताना ओपेनहायमरच्या भावनांशी त्याचा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. ‘ओपेनहायमरने जेव्हा अणुबॉम्ब बनवला होता, तेव्हा त्याच्या वापराने जपानमधील खूप लोक मारले गेले होते. तेव्हा त्याने स्वत:ला प्रश्न विचारला होता की, त्याने स्वत:चे कर्म व्यवस्थित केले का? त्याच्या त्या प्रसिद्ध मुलाखतीदरम्यान त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. याचा अर्थ त्याला त्याच्या कर्माबद्दल पश्चाताप वाटत होता,’ असे भारद्वाज यांनी नमूद केले.

 

‘त्याला कदाचित दिसत होते की या शोधामुळे भविष्यात माणुसकीच नष्ट होईल. त्याला त्याबाबत पश्चाताप वाटत होता. हा श्लोक त्याच्या मानसिक स्थितीबाबतही सांगतो. एक वैज्ञानिक २४ तास, सात दिवस आणि ३६५ दिवस कशाप्रकारे आपल्या शोधाबाबत विचार करतोय, हेच यातून दिसते. तो वेगळे काही करत असेल, तरीही तो पूर्णपणे त्याच्या या शोधाबाबतच विचार करत होता, हेच दिसून आले आहे. त्यामुळे डोक्यात सतत त्याच्या शोधाबाबतचे विचार सुरू असताना बाकीचे काम तो यंत्रवत करत होता, असे भारद्वाज यांनी सांगितले. ओपेनहायमरच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या बाबींचा या भावनेने लोकांनी विचार करावा, असे आवाहन भारद्वाज यांनी केले आहे.

Exit mobile version