धरणवीरांना धर्मवीर पदवी कधीच कळणार नाही

नितेश राणे यांचा अजित पवार यांच्यावर हल्लबोल

धरणवीरांना धर्मवीर पदवी कधीच कळणार नाही

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक या विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून चांगलाच वर निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. भाजप, इतर पक्ष तसेच हिंदू संघटनांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे . भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील पवार यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे . धरणवीरांना धर्मवीर पदवी कधीच कळणार नाही असा टोला नितेश राणे यांनी अजित पवार याना लगावला आहे. पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील राणे यांनी केली आहे.

या संदर्भातील एक व्हिडिओ राणे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये नितेश राणे म्हणतात की , होय आम्ही हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार असे ठणकावून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळींना सांगू.धरणवीरांना धर्मवीर पदवी कधीच कळणार नाही.

हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजे यांनी जे काही बलिदान दिले. इस्लामच्या समोर न झुकता औरन्गयाला जागा दाखवली हिंदू धर्माचे वेगवेगळे ग्रंथ लिहिले अशा धर्मवीरांना समजणं राष्ट्रवादी आणि पवारांना कधीच जमणार नाही म्हणून जास्त वेळ न घालवता थोडीपण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या पदावर जो ठप्पा लागला आहे तो अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

अजित पवार यांनी लोकांच्या भावना दुखावल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न संबोधून लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अध्यात्मिक शाखेचे पदाधिकारी तुषार भोसले यांनी केली आहे . छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाची शान आहेत. पवारांनी एकतर माफी मागावी किंवा महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करतील का, असा सवालही भोसले यांनी केला आहे.

Exit mobile version